Video Shows Elderly Man Creating A Makeshift Raincoat For Pet Dog : पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदरपासूनच आपण रेनकोट, छत्री, पावसाळी चप्पल घरात आणून ठेवतो, घरावरचे पत्रे गळू नयेत म्हणून त्याच्यावरसुद्धा प्लास्टिकचा कागद घालतो. पण, पाळीव किंवा भटक्या प्राण्यांचं काय? कारण- त्यांना पावसाळ्यात घराबाहेर घेऊन जायचं तर रस्त्यावर पाणी साठलेलं असतं, तर कुठे चिखल असतो. त्यावर उपाय म्हणून एका मालकानं जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये पावसापासून श्वानाचं संरक्षण करण्यासाठी एका मालकानं त्याला प्लास्टिकच्या पिशवीनं झाकलं आहे.

व्हायरल व्हिडीओ फिलिपिन्सचा आहे. आजोबा मार्केटमध्ये खरेदी करण्यास गेलेले असतात. आजोबांबरोबर त्यांचा साथीदार श्वानसुद्धा असतो. पण, मार्केटमध्ये ऐन वेळी पाऊस पडण्यास सुरुवात होते. पाऊस पडू लागल्यावर आजोबा आपल्या साथीदाराला कोरडे ठेवण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतात. ते श्वानाला सायकलच्या बास्केटमध्ये काळजीपूर्वक बसवतात आणि त्याला प्लास्टिकच्या पिशवीनं अशा रीतीनं झाकतात की, त्याला तात्पुरत्या रेनकोटप्रमाणे संरक्षण मिळेल. आपल्या श्वानाला पावसापासून वाचविणाऱ्या आजोबांचा हा व्हिडीओ बघाच…

500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा…‘छडी लागे छम छम…’माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भरली शाळा; मुख्याध्यापकाने सत्कार नव्हे, ‘असं’ केलं स्वागत की… ; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस

व्हिडीओ नक्की बघा…

आजोबांचा जुगाड :

पावसात भिजण्याचा आनंद जरी खास असला तरीही माणूस असो किंवा प्राणी प्रत्येकानं पावसात भिजताना स्वतःची काळजी घ्यायला हवी. असंच काहीतरी आज या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य मानलेल्या श्वानाच्या संरक्षणासाठी आजोबा अनोखा उपाय शोधून काढतात. पाऊस पडण्यास सुरुवात होते तेव्हा आजोबा त्या श्वानाला सायकलजवळ घेऊन जातात आणि बास्केटमध्ये बसवतात. मग तो भिजू नये यासाठी प्लास्टिकच्या पिशवीची रेनकोटप्रमाणे रचना करतात. त्यानंतर त्या श्वानाच्या डोक्यावर ते टोपीसुद्धा घालतात आणि दोघेही निघून जातात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये थोडक्यात व्हिडीओचं स्पष्टीकरण दिलं आहे. नेटकरीसुद्धा या व्हिडीओचं तोंड भरून कौतुक करताना दिसून आले आहेत. काही जण मालक व श्वानाच्या या खास नात्याचं कौतुक, तर काही जण इमोजीसह त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसून आले आहेत. आपल्या पाळीव प्राण्याच्या संरक्षणासाठी मालक कोणत्याही प्रसंगात त्यावर उपाय शोधून काढू शकतो, असे या व्हायरल व्हिडीओतून (Video) पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.

Story img Loader