Viral Video Shows Cutest Elephant Proposal : आजकाल अनेक मंडळी एखादे खास सरप्राईज देऊन, अंगठी किंवा पुष्पगुच्छ देऊन आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा प्रेयसीला प्रपोज करतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा प्रेयसीला प्रपोज करणे वाटते तितके सोपे नसते. कारण – काही जण हे प्रेम आनंदाने स्वीकारतात तर अनेक जण प्रेम नाकारतात. पण, तुम्ही कधी प्राण्यांना एकमेकांना प्रपोज करताना पहिले आहे का? नाही तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुमचेही मन जिंकेल.

व्हायरल व्हिडीओनुसार हत्ती प्रेयसीला प्रपोज करायला जातो आहे. यासाठी त्याने खास तयारी सुद्धा केलेली दिसते आहे. हत्तीने आपल्या सोंडेत जांभळ्या रंगाची फुले धरली आहेत. दबक्या पावलांनी चालत तो आपल्या प्रेयसीकडे येतो आणि तिला फुले देतो. जोडीदार सुद्धा आपल्या सोंडेने ती फुले स्वीकारतो आणि मग दोघेही एकमेकांना त्यांच्या स्टाईलमध्ये धन्यवाद म्हणताना दिसतात. हत्तीने आपल्या जोडीदाराला केलेला प्रपोज व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

जंगलातील प्राणी कसे राहतात, ते काय खातात, ते शिकार कसे करतात आदी अनेक गोष्टींबद्दल जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता असते. तर आज प्राण्यांमधील प्रेम पाहायला मिळाले आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, हत्ती सोंडेतून फुले घेऊन येतो आणि आपल्या प्रेयसीला देतो. त्यानंतर प्रेयसी सोंडेने ते फुल आपल्याजवळ घेते . थोडंसं पायावर बसून धन्यवाद म्हणतो आणि पुन्हा तेच फूल हत्तीकडे सोंडेने परत करतो. तुम्ही आतापर्यंत अनेक महागडे गिफ्ट देऊन प्रपोज केलेले पहिले असेल. पण, हा प्रपोज अगदी जगावेगळा आहे.

हत्तीला त्याचा साथी भेटला

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @spwrites20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत आणि ‘आता आम्हाला या दोघांचे लग्न सुद्धा बघायचे आहे’ असे म्हणताना दिसत आहेत. ‘आपल्यापेक्षा प्रेमळ लव्ह लाईफ त्यांची आहे, हत्तीला त्याचा साथी भेटला, दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा आहे’; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.

Story img Loader