Viral Video Shows Elephant And Her Baby : ऑफिस, शाळा, कॉलेजला जाण्याचा आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. कंटाळा येतो तो फक्त सकाळी उठण्याचा बरोबर ना… आपल्यातील काही जण अलार्म बंद करून, पुन्हा झोपून जातात. मग आई येऊन सतत हाका मारून आपल्याला उठण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? असे प्राण्यांबरोबरही घडत असेल का? त्यांची आईदेखील त्यांना आपल्या आईप्रमाणेच उठवत असेल का? तर आज याचे उत्तर सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) दोन हत्ती आणि एक लहान पिल्लू दिसते आहे. हत्तीचे पिल्लू आणि त्याच्या आईने तर सगळ्यांची मने जिंकली आहेत. कारण– घरी आई आणि आपल्यात सकाळी उठताना जे घडते, अगदी तसेच येथेसुद्धा घडताना दिसत आहे. हत्तीचे पिल्लू जमिनीवर गुपचूप झोपलेले असते. मग हत्तीण तिच्या पिल्लाला उठवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसते आहे. हत्तीची आई आपल्या पिल्लाला उठवण्यात यशस्वी झाली का ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…शेजाऱ्यांचे प्रेम! चिमुकलीने रेखाटलं गोल्डीसाठी चित्र, मालक झाला खूश अन्…; पाहा Viral Video
व्हिडीओ नक्की बघा…
कधी सोंड फिरवून तर कधी पिल्लाची शेपटी ओढून
आपली मुले अंथरुणातून उठावीत यासाठी आई नेहमीच नवनवीन कल्पना शोधून काढत असते. कधी पंखा बंद करते, तर कधी जोरजोरात हलवून मुलाला झोपेतून जागे करते. तर आज व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, हत्तीची आई पिल्लाला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. कधी सोंड फिरवून, तर कधी पिल्लाची शेपटी ओढून त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर हत्तीचे पिल्लूदेखील हार मानते आणि हळूहळू, कंटाळत उठून जागेवर उभे राहते आणि अशा प्रकारे व्हिडीओचा शेवट होतो.
कोणतीही आई आपल्या बाळाची झोप पूर्ण झाली असेल, तर ते आळशी होऊ नये यासाठी आई त्याला उठवण्यात कोणतीच कसर सोडत नाही. तसेच प्राण्यांबरोबरही घडताना पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या मजेशीर क्षणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nagendhirandna आणि @nagendhiran13dna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जगात प्रत्येक आई आणि मुलाची समस्या एकसारखीच आहे’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.