Viral Video Of Cat And Her Little Kitten : आई होणे ही जगातील एक खूप सुंदर गोष्ट आहे. बाळ जन्माला आल्यावर स्वतःला विसरून ती त्याच्यात गुंतून जाते. त्याला भूक तर लागली नाही ना, त्याची नीट झोप झाली ना आदी अनेक गोष्टींना ती पाहिले प्राधान्य देते, जे अगदीच स्वाभाविक आहे. माणूस असो किंवा प्राणी प्रत्येक आईसाठी तिचे लेकरू हे सारखेच असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक उदाहरण दाखवणारा व्हिडीओ व्हायरल (Viraहोत आहे. यामध्ये मांजर आणि तिच्या पिल्लूची तारेवरची कसरत दाखवण्यात आली आहे.
आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर राहते. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सुद्धा असेच पाहायला मिळाले आहे. मांजर आणि तिचे पिल्लू एका पाईपवरून चालत येत असते. मांजर पुढे पुढे तर तिच्यामागून तिचे पिल्लू हळूहळू चालत असते. अगदी दहा पाऊले चालल्यानंतर मांजर तिच्या पिल्लाकडे अगदी काळजीने बघत असते. एकदा बघाच आईचे प्रेम दर्शवणारा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, भिंतीवर एक पाईप असतो आणि या पाईपवरून मांजर आणि तिचे पिल्लू हळूहळू पावले टाकून चालत असते. आपले पिल्लू आपल्या मागूनच येते आहे, तिचा तोल तर गेला नाही ना अशी चिंता तिच्या मनात कुठेतरी घर करून असते. त्यामुळे बरोबर दहा पाऊले चालल्यानंतर मांजर तिच्या पिल्लाकडे पाहत असते. हे हृदयस्पर्शी दृश्य रस्त्यावरील एक अज्ञात माणसाने पहिले आणि त्याचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
सगळ्यांच्या भावना सारख्याच असतात
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @adenreels1321 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘१० पावले टाकल्यावर ती तिच्या लहान पिल्लाला तपासण्यासाठी मागे वळून पाहते’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी हा सुद्धा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. आई ती आईच, बरोबर १० पाऊले चालल्यानंतर मांजर पिल्लाकडे बघते आहे, मग तो प्राणी असो वा मानव. सगळ्यांच्या भावना सारख्याच असतात; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.