Viral Video Shows Father Desi Jugaad : लहान मुलांबरोबर प्रवास करणे वाटते तितके सोपे नसते. प्रत्येक क्षण त्यांच्यावर लक्ष ठेवून राहावे लागते. अशातच सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास केला तर ठीक; पण जेव्हा आपण वैयक्तिक गाडी घेऊन घराबाहेर निघतो, तेव्हा मात्र गाडी चालवणे आणि मुलांना सांभाळणे या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र पार पाडणे भरपूर कठीण जाते. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत व्यक्तीने अगदी हुशारीने ही जबाबदारी पेलली आहे. तर, या व्यक्तीने नक्की काय जुगाड केला आहे चला पाहू…
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, बाबांना दोन मुले आणि आपल्या बायकोला घेऊन स्कुटीवरून प्रवास करायचा असतो. अशा वेळेस मुलांना कुठे बसवायचे, असा प्रश्न बाबांच्या डोक्यात येतो. मग तो सोडवण्यासाठी बाबा जबरदस्त जुगाड करतात. तिघांपैकी एकाला बाबा स्कुटीच्या सीटच्या पुढे असणाऱ्या रिकाम्या जागेत बसवतात आणि उरलेल्या दोन मुलांना कसे बसवले हे एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
कुटुंबात बाबा सगळ्यात वेगळा विचार करणारे असतात ( Viral Video ) :
अनेकदा स्कुटीवर लहान मुलांना मागे बसवणे म्हणजे धोकादायक असते. अनेकदा तोल गेल्यामुळे मुले पडूसुद्धा शकतात. त्यामुळे बाबांनी आज जबरदस्त जुगाड केला आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मुलांना स्कुटीवरून नेण्यासाठी बाबांनी एक बॉक्स बसवून घेतला आहे. अगदी प्राण्यांना बॉक्समध्ये बंद करून घेऊन जातात, अगदी त्याचप्रमाणे त्यामध्ये त्यांनी दोन्ही मुलांना अगदी मजेशीर पद्धतीने बसवले आहे आणि तिसरी व्यक्ती पुढे बसली आहे असे दिसते आहे.
व्हिडीओत दिसतेय त्याप्रमाणे दोन्हीही मुले आरामात प्रवास करीत आहेत आणि त्यांचे बाबा निवांतपणे गाडी चालवताना दिसत आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rollrida या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘हे फक्त भारतातच घडते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरीसुद्धा “कुटुंबात बाबा सगळ्यात वेगळा विचार करणारे असतात”, “भीतीदायक आहे; पण असे दिसते की, मुले राईडचा आनंद घेत आहेत” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करीत आहेत.