Video Shows Father Give Surprise To His Daughter : बार्बी सेट आणि किचन सेट, व्हिडीओ गेम, वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन, सायकल आदी अनेक महागड्या गोष्टींचे लहानपणी प्रचंड क्रेझ असायची आणि या वस्तू घरचे घेऊन देतील असे स्वप्नही मनात असायचे. पण, घरात बाबा एकटेच कमवणारे असल्यामुळे या गोष्टी सहज मिळणे तेव्हा शक्य नव्हते. आता मोठं झाल्यावर पैसे तर आहेत पण त्या गोष्टी विकत घेण्याचे वय राहिलेल नाही याची खंत मनात आहे. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये एका चिमुकलीचे हेच खास स्वप्न पूर्ण झालेलं दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओत बाबा लेकीला खास सरप्राईज देतात. बाबा घराबाहेर नवी कोरी सायकल आणून ठेवतात. त्यानंतर ते लेकीला घराबाहेर घेऊन येतात. सायकल बघताच लेक थांबते, बाबांकडे बघते. त्यानंतर दोन पावले मागे जाते, तोंडावर हात ठेवून थेट रडायलाच लागते. नंतर बाबा तिला सायकलजवळ घेऊन जातात. लेक सायकलवर बसते आणि चालवण्यास सुरुवात करते. लाडक्या लेकीचे सायकल चालवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बाबाचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

हा आनंद फक्त मध्यमवर्गीय माणूसच समजू शकतो (Viral Video) :

लहानपणी इतर मित्र-मैत्रिणींबरोबर गार्डनमध्ये खेळायला जाताना आपल्याकडेच सायकल नसते यामुळे लहान मुलांना वाईट वाटते. त्यामुळे आई-बाबांकडे रुसून-फुगून हट्ट करून अगदी जेवण सोडून आपण सायकल हवीच असा हट्ट करतो. त्यामुळे पहिल्यांदा हक्काची सायकल दारात उभी असणे याचा अनुभव प्रत्येकासाठी खूप वेगळा आणि खास असतो. याचेच एक उदाहरण आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. लेक सायकल पाहताच खुश झाली आणि बाबांच्या कुशीत जाऊन रडू लागली.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @balak_krishan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून इमोशनल झाले आहेत आणि लहानपणीच्या आठवणीत रमून गेले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘हा आनंद फक्त मध्यमवर्गीय माणूसच समजू शकतो’, ‘सुपर हिरो बाबा’, ‘तिला सायकल मिळाली पण, मी भावुक का होतो आहे’, ‘मला माझी पहिली सायकल कधी मिळाली तेही आठवते’, ‘माझ्या १५ व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला सायकल गिफ्ट म्हणून दिली होती. मला त्यांची खूप आठवण येते’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.