Viral Video : आपण मुलांना जितक्या जास्त सुविधा देऊ, तितके चांगले पालक होऊ, असे अनेकांना वाटते. आई-वडिलांना फक्त एक मूल असेल, तर ठीक. पण, एकापेक्षा जास्त मुलं असतील, तर प्रत्येकाला सर्व सुविधा पुरविणे शक्य नसते. म्हणून काही जण लहानपणापासूनच एखादी वस्तू वाटून कशी घ्यायची किंवा काटकसर कशी करायची किंवा एखाद्या गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा याचे धडे मुलांना देत असतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये बाबांनी तिन्ही मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक जुगाड केला आहे.

घरातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असो; केक कापण्यापूर्वी मेणबत्त्या फुंकणे लहान मुलांना खूप आवडत असते. अशा प्रसंगी लहान मुलांची अनेकदा भांडणेसुद्धा होतात. त्यामुळे बाबांना एक कल्पना सुचली आहे. व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. आई-बाबांना तीन मुलं असतात. त्यातील एकाच वाढदिवस असतो आणि तिघांनाही केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकायच्या असतात. मग त्यासाठी बाबा केक टेबलावर ठेवतात आणि नक्की काय जुगाड करतात ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

viral video young girl dancing front of buffalo-or cow and see what happens next funny video goes viral
VIDEO: बापरे तरुणीनं हद्दच पार केली, तिचा तो विचित्रपणा पाहून म्हैस ही वैतागली; शेवटी जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mom desi jugaad for her pet Dog
जगात भारी आईचा जुगाड! चहात बिस्कीट बुडवण्यासाठी ‘त्याचा’ हट्ट; आईने श्वानाला असं फसवलं; पाहा VIDEO
Parent Came Up With A Unique Jugaad To Find Their Missing Kids At The Maha Kumbh Mela Video
VIDEO: कुभंमेळ्यात लहान मुलं हरवू नये म्हणून पालकांनी केला भन्नाट जुगाड; कपड्यांवर लावलं असं पोस्टर की वाचून पोट धरुन हसाल
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
Girl's celebrated father's birthday in a unique way
‘प्रत्येकाच्या पदरी एक तरी लेक असावी…’, चिमुकल्यांनी बाबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही भाग्यवान वडील”
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video of Father And Daughter
लाडूबाई…! चिखलातून जाताना बूट खराब होऊ नये म्हणून बाबांचा जुगाड; VIDEO पाहून कौतुक कराल

हेही वाचा…‘टम टम’ गाण्यावर हत्ती थिरकला, मुलींची नक्कल करताना दिसला; VIDEO पाहून सांगा कुणाचा डान्स जास्त आवडला?

व्हिडीओ नक्की बघा…

वडिलांचा आदर करा…

व्हायरल व्हिडीओत (viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, बाबा केकवर तीन मेणबत्त्या लावतात. तिघांना एकेक करून मेणबत्ती फुंकता यावी म्हणून छोट्या प्लेटचा उपयोग करतात. चिमुकली जेव्हा फुंकण्यास जाते त्याअगोदर बाबा त्या मेणबत्तीच्या जवळ प्लेट ठेवतात; ज्यामुळे दुसरी मेणबत्ती विझणार नाही. असे ते बाकी दोन्ही चिमुकल्यांच्या वेळीही करतात. त्यामुळे प्रत्येकाला एकेक मेणबत्ती फुंकण्यास मिळते आणि तिघांमध्ये भांडणही होत नाही. परिणामी शेवटी तिन्ही मुलांच्या चेहऱ्यावर या गोष्टीमुळे हसू फुललेलेही दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @the_5ukoon_line या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आपल्या वडिलांचा आदर करा’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओवर ‘बेस्ट फादर ऑफ द इयर’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. कमेंट्समध्ये काही जण बाबांच्या कल्पनेचं कौतुक करताना, तर काही जण चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे वर्णन करताना दिसून आले आहेत.

Story img Loader