Video Shows Women Help Father Who Selling Strawberries For Family : आई प्रेमळ असते आणि बाबा कठोर असतात असे समजले जाते. त्यामुळे अनेकदा बाबा आणि मुलांमध्ये प्रचंड वाद होतात. पण, या भांडणाची अनेक कारणं असू शकतात; त्यामध्ये एकतर जनरेशन गॅप, विचार न जुळणे, वयातील फरकामुळे अंतर निर्माण होणे. पण, बाबा प्रत्येक गोष्ट ही मुलांच्या हितासाठीच सांगत असतात. कारण त्या प्रत्येक गोष्टीतून त्यांच्या तरुणपणात त्यांनीही कुठेतरी या गोष्टी सोसलेल्या असतात. त्यामुळे बाबांनी घेतलेले कष्ट, त्यांनी गाळलेला घाम, त्यांनी कुटुंबासाठी केलेल्या गोष्टीची परतफेड करणे कठीण असते.
तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये बाबा कुटुंबाच्या पोटा-पाण्यासाठी स्ट्रॉबेरी विकत असतात. हे दृश्य रिक्षातून प्रवास करणारी एक तरुणी पाहते. यादरम्यान सिग्नल सुटतो. पण, तरुणीला स्ट्रॉबेरी विकणाऱ्या विक्रेत्याला मदत करायची असते. सिग्नल सुटल्यामुळे सगळ्या गाड्या वेगाने धावू लागतात. त्यामुळे ती रिक्षा चालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगते. यासगळ्यात बाबा सुद्धा रिक्षाच्या स्पीडने धावण्यास सुरुवात करतात. पुढे नक्की काय घडते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
कष्ट केलेल्या वडिलांच्या कुटुंबात वाढवलेली मुलगी (Viral Video) :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, ‘तुम्ही धावू नका, आम्ही थांबू’ असे तरुणी विक्रेत्याला म्हणते. पण, तरीही ते धावत्या गाड्या पार करून तरुणीच्या रिक्षापर्यंत पोहचतात. त्यानंतर रिक्षा रस्त्यालाकडेला थांबवल्यानंतर विक्रेता तरुणीच्या हातात स्ट्रॉबेरीचे तीन बॉक्स देतो. पण, तरुणी फक्त एकच बॉक्स घेते आणि त्यांना तीन बॉक्सचे पैसे त्यांना देते. हे पाहून ते काही क्षणांसाठी तिच्याकडे पाहत राहतात आणि नकळत तिच्या पाया पडून तिथून निघून जातात, जे पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pallavi__shelar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बाबा कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतो’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत आणि ‘म्हणूनच आपण बाबाला सुपरहिरो म्हणतो’, ‘ते शेवटी तुमच्या पाय पडले’,’संघर्ष करणारा माणूस आणि त्याचा संघर्ष समजून घेणारी ती मुलगी’, ‘कष्ट केलेल्या वडिलांच्या कुटुंबात वाढवलेली मुलगी’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.