Video Shows Fight between Thar And Auto Driver : अनेकदा वाहनचालकांमध्ये जोरदार भांडणे होताना दिसतात. कधी कधी ही भांडणे इतक्या टोकाला जातात की, रागात गाड्यांच्या काचा फोडल्या जातात, एकमेकांना अगदी रक्त येईपर्यंत मारहाण केली जाते. त्यामुळे मध्यस्थी करायला त्यांच्यामध्ये सहसा कोणीही जात नाही. कारण- त्यांच्यामध्ये चूक कोणाची आहे हे शेवटपर्यंत कधी कधी कळतच नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये थारमालक आणि रिक्षाचालकाचे जोरदार भांडण सुरू आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. या व्हिडीओत पाऊस पडल्याचे आणि रस्ता पाण्याने तुडुंब भरल्याचे दिसते आहे. अशा या रस्त्यावर रिक्षाचालक आणि थारचालक यांच्यात जोरदार भांडण झालेय. रिक्षाचालक त्याचा सर्व राग थारचालकावर काढताना दिसत आहे. याचदरम्यान त्याच्या हातात सळीसुद्धा दिसते आहे. नक्की काय झाल ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा …
https://twitter.com/gharkekalesh/status/1901206434760589675
थार मालकाने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला… (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, रिक्षाचालक रिक्षातून उतरून थारच्या जवळ जातो. गाडीच्या बाहेर उभा राहून त्याला वारंवार बाहेर पडण्यास सांगतो. रिक्षाचालक संतप्त अवस्थेत वारंवार “तू पहिला बाहेर ये”, असे बोलतोय आणि त्याच्या हातात एक सळीसुद्धा असते. जर थारचालक बाहेर आला, तर रिक्षाचालक नक्कीच त्याच्यावर हल्ला करणार इतक्या तयारीत तो दिसतो आहे. पण, रिक्षाचालकाला आलेला राग पाहून थारचालकाने गाडीबाहेर पडण्याची हिंमत केली नाही. मग रिक्षाचालकही पुन्हा रिक्षात जाऊन बसला.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काही जण थारमालकाने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला, रिक्षाचालक वेगळ्याच मूडमध्ये दिसतो आहे, रिक्षाचालकाशी कधीही भांडू नका. ते जास्त शक्तिशाली असतात, पाऊस कुठे पडतो आहे आदी अनेक मजेशीर, तसेच रिक्षाचालकाला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.