Viral Video Of Delivery Agents Taking Care Of Restaurant Owner’s Baby: पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजकाल अनेक स्त्रिया घर, मूलबाळ, नोकरी आदी तिन्ही गोष्टी सांभाळताना दिसतात. पण, कामाच्या गडबडीत या जबाबदाऱ्या एकत्र पेलणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. अशावेळी मदत करणारी माणसं मिळाली तर त्याहून मोठं सुख आईसाठी कोणतंच नसतं. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; यामध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिलेचे लहान बाळ डिलिव्हरी बॉय टप्प्याटप्प्याने सांभाळताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओ चीनमधील आहे. एक आई रेस्टॉरंटची मालक असते. रेस्टॉरंट सांभाळता-सांभाळता ती तिच्या चिमुकल्याचीसुद्धा काळजी घेत असते. तर काही फूड डिलिव्हरी बॉय त्यांच्या ऑर्डरसाठी वाट बघत थांबले आहेत. आईने बाळाला स्ट्रोलरमध्ये ठेवलेले असते. यादरम्यान पिकअप ऑर्डर्सची मागणी वाढू लागते, तर हे पाहता फूड डिलिव्हरी बॉय आईच्या मदतीसाठी धावून जातात. फूड डिलिव्हरी बॉय कशाप्रकारे मदत करतात, एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Why Walking is good During Pregnancy
गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा…Viral Video: बॅग खरेदीसाठी गेल्या दुकानात; अचानक संतापलेल्या बैलांची झाली एंट्री अन्… संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

व्हिडीओ नक्की बघा…

डिलिव्हरी बॉयने घेतली चिमुकल्याची काळजी :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अचानक जास्त ऑर्डर आल्यामुळे काम व लहान बाळाला सांभाळणे महिलेसाठी कठीण जाते. हे पाहून ऑर्डर पिकअप करण्यासाठी वाट पाहणारे फूड डिलिव्हरी एजंट्सपैकी एक बाळ स्ट्रोलर हलवून बाळाला शांत करण्यास मदत करतो आहे. तसेच त्या डिलिव्हरी बॉयची ऑर्डर पॅक करून झाल्यावर तो ऑर्डर देण्यासाठी निघून जातो, तेव्हा दुसरा डिलिव्हरी बॉय तेथे येऊन बसतो आणि ऑर्डर पूर्ण होईपर्यंत बाळ शांत राहील याची खात्री करून घेतो. असं टप्याटप्प्याने डिलिव्हरी बॉय बाळाची काळजी घेत महिलेची मदत करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. तर तिन्ही डिलिव्हरी बॉयच्या दयाळूपणाने नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत. व्हिडीओ पाहून एक युजर म्हणाला की, ‘अशा लोकांची जगाला गरज आहे’, तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘आजच्या दिवसातील सुंदर व्हिडीओ’ आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत.

Story img Loader