स्केटिंग करायला अनेकांना भीती वाटते. बराच काळ सराव केल्यानंतरही अनेकांना परफेक्ट स्केटिंग जमत नाही. एका विदेशी तरूणाच्या अनोख्या स्केटिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विदेशी तरूणाची स्केटिंग पाहून हैराण व्हाल. वेगात धावणारी एक बस पकडण्यासाठी चक्क या विदेशी तरूणाने स्केटिंग केलीय. बसला पकडून केलेली ही थरारक स्केटिंग पाहून काही वेळासाठी मनात धडकी भरू लागते. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्य होऊ लागले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक विदेशी तरूणाने बसला मागच्या बाजूने पकडलं आहे. जस जशी ही बस वेगात धावतेय, तस तसं हा विदेशी तरूण स्केटिंग करत बसच्या मागोमाग जाताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी मनात भीती वाटू लागते की, बसला पकडून स्केटिंग करताना काही मागेपुढे झालं तर जीव धोक्यात येईल. पण हा विदेशी तरूण अगदी सहज स्केटिंग करत बसचा पाठलाग करताना दिसतेय.
आणखी वाचा : इथे मरणावर आहे बंदी, ७५ वर्षापासून अंत्यसंस्कार झाले नाहीत तर रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत
हा व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूमधला आहे. इथल्या कोईम्बतूर जिल्ह्यातल्या पश्चिम घाटाच्या बाजूने असलेला निलगिरी जिल्हा हा जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. कोईम्बतूर जिल्ह्याच्या जवळ असल्याने जगातील विविध देशांतील अधिक पर्यटक कोईम्बतूर विमानतळावर येतात. कोईम्बतूर विमानतळावरून बाहेर पडलेल्या एका परदेशी तरूणाने कोईम्बतूरच्या अविनासी रोडवरून सरकारी बसची पकडण्यासाठी चक्क स्केटिंग केलीय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलगा की मुलगी? हे जाहीर करण्यासाठी अख्खा धबधबाच निळ्या रंगाचा केला
चित्रा परिसरापासून हॉब्स कॉलेजपर्यंत सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अविनासी रोडवर एका परदेशी तरूणाला स्केटिंग करताना पाहून ये-जा करणारे लोकही थक्क झाले. प्रचंड रहदारी असलेल्या गजबजलेल्या अविनासी रस्त्यावर धावणाऱ्या बसच्या मागे एक विदेशी तरूणाची स्केटिंग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. धोका लक्षात न घेता परदेशी तरूणाच्या या कृत्याने वाहनधारक हैराण झाले.
आणखी वाचा : डोळ्यात अश्रू… हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : साप भिंतीवर असा सरसर चढला की पाहून लोक म्हणाले, “परफेक्ट स्नेक गेम”
सध्या आयुधा पूजा आणि सरस्वती पूजनामुळे सलग सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. परिणामी लोकांनी तामिळनाडूमधील विविध पर्यटन स्थळांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. उटी आणि कोडाईकनाल सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांवर लोकांची गर्दी असते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.