Viral Video Shows True Friendship : मित्र कसा असतो, जो कठीण प्रसंगात तुमचा हात धरतो, तुमच्या परिस्थितीला समजून घेतो, तुमच्या पाठीशी सदैव उभा राहतो, तुम्ही किती यशस्वी व्हाल यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे असा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि हा मित्र बरोबर असतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आणि आयुष्यात एक वेगळाच आनंद व चमक असते. आज सोशल मीडियावर अशाच एका मित्राची झलक पाहायला मिळाली आहे, जी पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच शहारे येतील.

दोन्ही मित्र स्टेजवर उभे आहेत. त्यातील एक मित्र पोटा-पाण्यासाठी आपली कलाकारी दाखवताना दिसत आहे. एका टेबलावर दोन वस्तू ठेवून, त्यावर एक फळी ठेवून त्याला तोल सांभाळत उभे राहायचे असते. यादरम्यान त्याचे अनेक प्रयत्न अश्यस्वी होतात; पण त्याचा दुसरा मित्र उपस्थितांना टाळ्या वाजवायला सांगून, त्याचा उत्साह वाढवण्यास सांगतो. त्यानंतर असा एक क्षण येतो जेव्हा कलाकारी दाखविणाऱ्या मित्राचा प्रयत्न यशस्वी होतो. पण, यादरम्यान पहिल्या मित्राचे हावभाव पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, अगदी जेव्हा मित्र स्टंट करण्यासाठी त्या टेबलावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हापासून ते अगदी तो स्टंट करण्यात यशस्वी होईपर्यंत मित्राची नजर फक्त आणि फक्त मित्राच्या पायांकडे असते. त्याचा तोल जाणार नाही ना, त्याला इजा होणार नाही ना, तो स्टंट पूर्ण करू शकेल आदी सगळ्या गोष्टींची चिंता त्यांच्या डोळ्यांत अगदी स्पष्टपणे दिसत होती. पण, तो भीती लपवून फक्त आणि फक्त मित्राचा परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी त्याला प्रोत्साहन देत होता.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thenaughtybrain या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘त्याच्या मित्राचे डोळे बघा’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि ‘कुठे मिळतात असे मित्र?, एका पुरुषाला घर चालवण्यासाठी काय काय करावे लागते, पुरुषांचे आयुष्य एवढे सोपे नसते, आयुष्यात एक असा मित्र असावाच आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.

Story img Loader