Viral Video Shows True Friends Have Your Back : आपल्या आयुष्यात अनेक मित्र असतात. शाळा, कॉलेज, क्लास, नोकरी येथे सुद्धा अनेकांबरोबर आपली मैत्री होते. पण, या सगळ्यात सारखी भेट न होतादेखील जिथे या मनातलं त्या मनाला अचूक कळतं असा एक मित्र सगळ्यांच्याच आयुष्यात असतो. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी, आपल्यातल्या चुका दुरुस्त करणारी, आपल्याबद्दल कधीही वाईट विचार मनात न आणणारी, आपल्या सुखं-दुःखात नेहमी बरोबर असणारी ही मैत्री खूपच खास असते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये मित्र रडत असताना त्याच्या खास मित्राची एंट्री झाली आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एक चिमुकला रस्त्याकडेला सायकल पार्क करून उभा आहे आणि रडताना दिसतो आहे. आपलं दुःख कोणालातरी सांगता यावं यासाठी तो इथे-तिथे पाहतो. तितक्यात त्याचा दुसरा मित्र तिथे येतो. तो चिमुकल्याच्या जवळ आपली सायकल पार्क करतो, सायकलवरून उतरतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. चिमुकल्याच्या मित्राने त्याला कसं शांत केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असावी…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकल्याला रडताना पाहून त्याचा मित्र सायकल घेऊन त्याच्याजवळ येतो. सायकल पार्क करून त्याच्याजवळ जातो. त्याच्या खांद्यावर हात ठेवतं, त्याला समजावतटी-शर्टने त्याचे डोळे पुसतो. चिमुकला हे पाहून खूप खुश होतो. आपल्या मित्राबरोबर हात मिळवतो आणि त्याचा हात घेऊन पुन्हा स्वतःचे डोळे पुसतो. त्यानंतर दोघेही मित्र एकमेकांशी संवाद साधतात आणि स्वतःची सायकल घेऊन निघून जातात. सुख दुःखात साथ देणारा मित्र लाभला तर आयुष्याची प्रत्येक मॅच जिंकता येते, याचे उत्तम उदाहरण या व्हिडीओत पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @royal_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असावी’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा स्वतःच्या खास मित्राला टॅग करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, आपल्या आनंदात सहभागी होणारा आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच खरा मित्र असतो.