Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jethala Chikani Chameli Song Recreate By Group : सुटीच्या दिवशी दिवसभर टीव्हीवर किंवा जेवताना मोबाईलवर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (tmkoc) आपल्यातील बरेच जण बघत असतील. या मालिकेचे जुने एपिसोड अगदी कितीही वेळा बघितले तरीही अगदी पहिल्यांदा बघितल्याप्रमाणेच हसू येते. मागच्या काही काळात ही मालिका अनेक कलाकारांनी सोडली असली तरीही त्याची क्रेझ आजही बऱ्याच प्रेक्षकांमध्ये आहे. आजही अनेक जण मालिकेच्या पात्रांची नक्कल करताना दिसतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तुम्ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अगदी जुना ‘अंताक्षरी नाईट’चा एपिसोड पहिला असेल, तर जेठालालने त्यात ‘चिकनी चमेली’चे स्वतःचे गाणे बनवून, त्यात सादर केलेला डान्ससुद्धा नक्कीच आठवेल. तर हाच डान्स थोड्या ट्विस्टसह काही तरुण मंडळींनी सादर केला आहे. लग्न, डोहाळजेवण असो किंवा डान्स अशा कार्यक्रमांत डान्स परफॉर्मन्स होणार नाही, असे या काळात शक्यच नाही. तर, आज तरुण मंडळींनी एका कार्यक्रमात ‘अग्निपथ’ चित्रपटातील ‘चिकनी चमेली’ गाण्यावर डान्स केला आणि काय ट्विस्ट दिला ते व्हिडीओतून बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

तारक मेहता का उल्टा चष्माचे प्रेम…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ग्रुप डान्स सुरू असताना अचानक ‘जेठीया’ (सीरियलमधील प्रसिद्ध पात्र – जेठालाल), असे म्हणत एका माणसाची एंट्री होते. त्यानंतर तोस माणूस जेठालाल ज्या सुरात, तालात गाणे गाऊन, गाण्याचे बोल बदलून डान्स करतो अगदी त्याच पद्धतीत सगळ्या स्टेप्स करून डान्स करण्यास सुरुवात करतो आणि त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने हा मजेशीर डान्स मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @panktilakhanichoreography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आमच्यातले तारक मेहता का उल्टा चष्माचे प्रेम कधीच कमी होणार नाही’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि डान्समधील हा ट्विस्ट त्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Story img Loader