Viral Video Shows Girl create Handmade gift : मुलं मोठी होत जातात तेव्हा अनेक पालकांना आपण यांना घरी काय शिकवायचं असा प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतो. कारण – ही मुलं एका बाजूने शाळेत जाण्यासाठी तयार होत असतात. अशावेळी यांना घरी काय शिकवायचं? तर अनेक पालक वयानुसार लहान मुलांना अ‍ॅक्टिव्हिटी करायला देतात. तर विविध प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटी करून मुलं इतकी क्रिएटिव्ह होतात की, या सगळ्या शिकलेल्या गोष्टीतून ते स्वतःची एक वेगळीच कल्पना सगळ्यांसमोर येऊन ठेवतात जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.यामध्ये एका चिमुकलीने बाबांसाठी हँडमेड गिफ्ट बनवलं आहे.

चिमुकलीच्या बाबांचा वाढिदवस असतो. तर चिमुकली व तिच्या आईने काही दिवसांपूर्वी कपड्यांना रंगवणे (cloth-dyeing activity) ही मजेशीर अ‍ॅक्टिव्हिटी करून पहिली होती. तर हे डोक्यात ठेवून चिमुकलीला सुद्धा बाबांना असंच काहीतरी गिफ्ट करण्याचे ठरवते. पण, यासाठी ती पानांचा उपयोग करते. काही झाडांची पाने घेऊन ती बाबांसाठी खास हँडमेड गिफ्ट बनवते आणि बाबा देखील हे गिफ्ट पाहून खुश होतात. लेकीने मेहनतीने बाबांसाठी कसं गिफ्ट बनवलं व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : पीएचडीची डिग्री घेऊन रस्त्यावर विकतोय चिकन; कारण ऐकून आनंद महिंद्रांनी केलं कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा…

व्हायरल व्हिडीओच्या सुरवातीला चिमुकली झाडाची काही पाने कैचीने कापून घेते. त्यानंतर एका नव्या-कोऱ्या शर्टवर ती झाडाची पाने लावते, त्याच्यावर प्लास्टिक ठेवते आणि लाकडी हातोड्याने ठोकते, जेणेकरून पाने शर्टवर डिझाईनसारखी चिटकून जातील. अशाप्रकारे ती शर्ट डिझाईन करते. त्यानंतर एका लाकडी बॉक्समध्ये शर्ट, ग्रीटिंग कार्ड ठेवून देते आणि बाबांना जाऊन देते. बाबा देखील गिफ्ट पाहून खुश होतात आणि चिमुकलीला धन्यवाद म्हणत तिला मिठी मारतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bhagyashree_deore या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही दोघींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या कपड्यांना रंगवण्याच्या अ‍ॅक्टिव्हिटीला प्रेरित होऊन माझ्या मुलीला तिच्या बाबांसाठी एक खास भेट तयार करण्याची इच्छा होती. या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे लहान मनांवर कसा प्रभाव पडतो हे आपण व्हिडीओत पाहिलं,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! ; अशी पोस्ट आईने या व्हिडीओखाली लिहिली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून चिमुकलीच्या कल्पनेचं कौतुक करताना दिसत आहेत.