viral Video : बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अगदीच सामान्य आहे. अनेकदा सोशल मीडियावर वाहतूक कोंडीच्या अनेक मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात. हेलिकॉप्टरमुळे ट्रॅफिक जाम होणे किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे लॅपटॉप उघडून काम करणं, अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. पण, आज एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ट्रॅफिकदरम्यान अडकलेल्या एका तरुणीनं मजेशीर कृत्य केलं आहे; जे पाहून तुम्हाला हसू येईल आणि आश्चर्यही वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा आजूबाजूच्या परिसरात एखादा कार्यक्रम सुरू असेल आणि जोरजोरात गाणी वाजत असतील, तर आपण त्या गाण्यांच्या तालावर ठेका धरतो. आज व्हायरल व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) बंगळुरूचा आहे. बंगळुरूमध्ये दोन महिला रिक्षात ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या असतात. त्यादरम्यान बाजूला ढोल-ताशांसह उत्सव सुरू असतो. तो आवाज आणि वातावरण पाहून तिलाही डान्स करण्याची अनावर इच्छा होते. ट्रॅफिकमध्ये बराच वेळ जाईल याची कल्पना त्या दोघींनाही असते. मग ती तरुणी नेमकं काय करते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘मुंबईकरांनो सावधान’ म्हणत शेअर होतोयं VIDEO ; नाशिक महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा; वाचा घटनेची खरी गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

ढोल-ताशांचा आवाज :

व्हायरल व्हिडीओत (Vira Video) तुम्ही पाहिलं असेल की, तरुणी ढोल-ताशांचा आवाज आणि नाचणाऱ्या मंडळींना पाहून उत्साहित होते. तिला तेथे जाऊन इतर लोकांबरोबर नाचण्याची इच्छा होते. पण, ती रिक्षात, ट्रॅफिकमध्ये असते. त्यानंतर मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती रिक्षातून उतरते आणि नाचायला जाते. बंगळुरूची मंडळीदेखील तिचे अगदी आनंदात स्वागत करतात आणि तिच्याबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतात. थोडा वेळ नाचून झाल्यानंतर ट्रॅफिक सिग्नल सुटतो आणि मग ती पुन्हा धावत रिक्षात बसायला येते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @sharanyaxmohan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘इतकी वर्षे बंगळुरूनं मला खुश करण्याचा एकही मार्ग सोडला नाही. मला वेळोवेळी अनोखे अनुभव आले’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांना हा व्हिडीओ मजेशीर वाटला म्हणून ते हसत आहेत; तर काही जण हे खूपच भारी आहे, असं म्हणून कमेंट्समध्ये व्हिडीओची प्रशंसा करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows girl dancing on middle of bengaluru traffic you will laugh and shock asp