Video Shows Girl Trapped Dead Mosquitoes On Paper : आपल्यातील अनेकांना एखादा तरी छंद हा असतोच. हा छंद कधी कधी कलेतसुद्धा बदलतो. बागकाम, डान्स, चित्रकला, कोणाला स्टॅम्प जमविण्याचा, तर कोणाला विविध प्रकारची नाणी गोळा करून ठेवण्याचा छंद असतो. पण, अलीकडेच असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. त्या व्हिडीओनुसार, एका तरुणीला विचित्र छंद आहे आणि तोही मच्छर मारण्याचा. हो, तुम्ही बरोबर वाचलंत…
आकांक्षा रावतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती तिच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या मैत्रिणीकडे बोट दाखवते आणि, “लोकांना कसे विचित्र छंद असतात आणि त्यापैकी सर्वांत विचित्र छंद हिला आहे. थांबा, मी तुम्हाला दाखवते”. असे ती म्हणते आणि एक कागद दाखवते. त्या कागदावर मच्छर मारून, त्यांना चिकटवून ठेवण्यात आलेले असते. एकदा बघाच हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
फक्त मच्छर मारून कागदावर चिकटवल्याच नाहीत. तर प्रत्येक मच्छरला एक नाव देण्यात आले आहे. रमेश, टिंकूपासून ते प्रसिद्ध सिग्मा बोई (Sigma Boi)पर्यंत अशी नावे दिली गेली आहेत आणि त्यांच्या शेजारी मृत्यूची वेळ, मृत्यूचे ठिकाणसुद्धा लिहिले आहे. विशेष बाब म्हणजे व्यवस्थित पट्टी-पेन्सिलने आखून प्रत्येक मच्छरसाठी एक वेगळी जागा ठेवली आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
या पिढीतील मच्छरसुद्धा सुरक्षित नाही (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @akansha_rawat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘अद्वितीय छंद’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली गेली आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून, रीलला पाच दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत आणि त्यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत. “द रिअल डेथ नोट्स”, “संपूर्ण डास समुदाय घाबरला आहे”, “रक्त शोषणारे डास मादी आहेत, पण त्यांना पुरुषांची नावे देण्यात आली आहेत. पुरुषांचे जीवन कठीण आहे”, “या पिढीतील मच्छरसुद्धा सुरक्षित नाही आहेत” ; आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.