Viral Video Shows Hostel Daily Routine : प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे यासाठी शहरांत व गावांत वसतिगृहे (हॉस्टेल्स) बांधण्यात आली आहेत. बाहेरगावाहून शिकण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना व नोकरीच्या शोधात आलेल्या तरुण मंडळींना या हॉस्टेलमध्ये आयुष्यभर साथ देणारे जीवलग मित्र भेटतात आणि हळूहळू हॉस्टेलच्या छोट्याशा रूममध्ये राहणारी ती सगळी मंडळी एक कुटुंब होऊन जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत (Viral Video) आहे. त्यामध्ये हॉस्टेल लाईफ कशी असते हे दाखविण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओ हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही तरुणींनी शूट केला आहे. यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या दिनचर्या कशी असते, याची त्यांनी छोटीशी झलक दाखवली आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुणी येऊन, तिच्या बाकी मैत्रिणींना उठवते. मग बादली घेऊन अंघोळ करण्यासाठी रांग लागते. अंघोळ करून कधी बाहेर येणार याची वाट बघत असताना जर तुम्हाला झोप लागली तर कोणती तरी तिसरीच व्यक्ती बाथरूममध्ये शिरते. मजेशीर हॉस्टेल लाईफ एकदा तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) बघा…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/reel/DDUKc4KBZfr/?igsh=MXVzM2lmYm9zMW81ag%3D%3D
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, केसात ब्रश अडकवणे, हॉस्टेलच्या पायऱ्यांवर बसून अभ्यास करणे, रील्स बघणे, कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलणे, बाजूच्या रूमचा दरवाजा ठोकून पळ काढणे, रूममध्ये डान्स करणे आदी अनेक गोष्टी या व्हिडीओत दाखवण्यात आल्या आहेत. असं म्हणतात की, हॉस्टेलमध्ये गेल्यावर सगळ्यांबरोबर जुळवून घेण्याची सवय लागते, स्वतःचा नव्याने शोध लागतो. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर हॉस्टेलमधून घरी जाणं खरं तर किती आनंददायी असायला पाहिजे, पण अनेक मित्र-मत्रिणींना याचं वाईट वाटतं. कारण- रूमवरची एन्डलेस मजा मिस होणार असते.
हॉस्टेल लाईफ
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rimpi_piu_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘हॉस्टेल डेली रुटीन’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांना त्यांची हॉस्टेल लाईफ आठवली आहे. व्हिडीओ पाहून एकाने ‘आमची गुड्डी खूप अभ्यास करते’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर अनेक जण त्यांच्या हॉस्टेलच्या मित्र-मैत्रिणींना कमेंट्समध्ये टॅग करताना दिसले आहेत; तर काही जण पोट धरून हसत आहेत.