Video Shows Good Old School Memories : शाळा म्हणजे आपल्या आठवणींची एक पेटी. या पेटीत कोणी चांगल्या, तर कोणी वाईट आठवणी जपून ठेवलेल्या असतात. कधी शिक्षकांचे ओरडणे, तर कधी शाबासकी, शाळेत विद्यार्थ्यांबरोबर मजा-मस्ती करणे, हसणे-रडणे, विविध कार्यक्रमांत सहभागी होणे, शाळेत तासन् तास थांबणे, होळीदरम्यान शाळा सुटल्यावर एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, फ्रेंडशिप डेला एकमेकांच्या हातावर बॉलपेन वा स्केचपेनने नावे लिहिणे आदी अनेकविध गोष्टी आपण सगळ्यांनी शाळेत नक्कीच केल्या आहेत. तर आज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ (Video) पाहून तुमच्याही आठवणी ताज्या होतील.

अनेकदा कपाट लावताना किंवा साफसफाई करताना अचानक जपून ठेवलेल्या, धुळीची पुटे चढलेली डायरी, पुस्तके, एखादी फाईल वा फोल्डरकडे लक्ष जाते. आज व्हायरल व्हिडीओ शेअर करणाऱ्या तरुणीलासुद्धा साफसफाई करताना शाळेतील काही जुन्या वस्तू दिसल्या. शाळेतील प्रगती पुस्तकापासून ते वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या एकत्रित फोटो (ग्रुप फोटो)पर्यंत अनेक गोष्टी तिला दिसल्या आणि तिने या सगळ्या वस्तूंचा एक खास व्हिडीओ शेअर केला. तरुणीला नक्की काय काय सापडले ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, जमिनीवर प्रगती पुस्तक, गुणपत्रिका, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित फोटो (ग्रुप फोटो), क्रीडा स्पर्धेत मिळालेले मेडल, अवॉर्ड, जर्सी (पीटी युनिफार्म), वार्षिकोत्सवात डान्स आणि नाटकात सहभागी असताना घेतलेले फोटो, फ्रेंडशिप बॅण्ड, चॉकलेटचे कागद आदी अनेक गोष्टी ठेवलेल्या दिसत आहेत, ज्या पाहून तरुणी भावूक झाली आहे आणि तिने या वस्तूंचा शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ते दिवस खूप चांगले होते…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hyp3grls_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वस्तू साफ करत असताना अचानक आठवणी डोळ्यांसमोर येतात,’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून जुन्या आठवणींत रमून गेले आहेत. आपण कुठे फसलो आहे यार, ते दिवस खूप चांगले होते, मीसुद्धा अजूनपण या वस्तू जपून ठेवल्या आहेत आदी अनेक कमेंट्स; तर अनेक जण त्यांच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनी टॅग करताना दिसत आहेत.

Story img Loader