Video Shows girls Making Biryani In Hostel : शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक मुली वसतिगृहांमध्ये राहतात. हॉस्टेलमध्ये अनेक नियम असतात. ठरलेल्या वेळेत उठायचे, ठराविक वेळेनंतर बाहेर जायचे नाही, तर ठराविक वेळेतच परत यायचं. त्याचबरोबर हॉस्टेलचे मिळणारे जेवण जेवावे लागते. आवडीचे पदार्थ आपण बनवू शकत नाही किंवा खाऊ शकत नाही, त्यामुळे यादरम्यान आईच्या हातच्या जेवणाचीसुद्धा खूप आठवण येते. पण, घरी जाऊ शकत नाही, त्यामुळे अनेक तरुणी जुगाड करून त्यांच्या खाण्यापिण्याची हौस पूर्ण करतात.
हॉस्टेलमध्ये अज्ञात मुलींबरोबर मैत्री होते. मग हॉस्टेलच्या रूममध्ये नवीन मैत्रिणींसोबत अभ्यासाबरोबर मजा-मस्तीही केली जाते. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत (Video) काही तरुणी मिळून व्हेज बिर्याणी बनवताना दिसत आहेत. त्यांनी पाणी गरम करण्याचा मग, इलेक्ट्रिक शेगडीचा वापर, फूड कलर, ॲल्युमिनियम फॉईल पेपरचा वापर करून अगदी हॉटेलमध्ये बनवतात तशी बिर्याणी बनवली आहे. तरुणींनी कशाप्रकारे बिर्याणी बनवली व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/reel/DFj1HLqSznL/?igsh=bXkwdmhvdGR0cjI%3D
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, चिकन किंवा भाज्या नाही तर बटाट्यांपासून ही बिर्याणी बनवण्यात आली आहे. पण, बिर्याणी बनवताना तरुणींनी छोट्या-छोट्या वस्तूंचा वापर केला आहे आणि अगदी चविष्ट अशी बिर्याणी बनवली आहे, जे पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. हॉस्टेलमध्ये परवानगी नसताना त्यांनी कशाप्रकारे या वस्तू आणण्याचा जुगाड केला याचा उल्लेख मात्र त्यांनी व्हिडीओत केलेला दिसत नाही. पण, हॉस्टेलच्या नियमांविरुद्ध जाऊन त्यांनी हे धाडस केले आहे असे दिसून आले आहे.
बिर्याणी बनवताना सुगंध नाही आला का?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @aishika_choudhury या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कडक नियम असणाऱ्या हॉस्टेलमध्ये बिर्याणी पार्टी’; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. बिर्याणी बनवताना सुगंध नाही आला का? यावर तरुणींनी आम्ही एक्झॉस्ट फॅन लावला होता आणि खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या असे सांगितले. तर ही रील हॉस्टेलच्या मालकाने बघितली तर? यावर तरुणींनी आता आम्ही हॉस्टेल सोडले आहे, असे आवर्जून म्हटले आहे. म्हणजेच हा व्हिडीओ जुना असून तरुणींनी आठवण म्हणून हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी शेअर केला आहे.