Chawl Viral Video : चाळ आणि चाळीतल्या आठवणी सांगाव्या तितक्या कमीच आहेत. एकीकडे भांडण झाल्यावर एकमेकांपासून अबोला धरणारे तर दुसरीकडे संकट काळात त्याचीच मदत करायला धावून जाणारे. एका व्यक्तीबरोबर वाईट घडले तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि एका व्यक्तीबरोबर चांगले घडले की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद अशी चाळीतल्या माणसाची ओळख; असे म्हणायला हरकत नाही. तर आज सोशल मीडियावर चाळीत एखादे लग्न कशाप्रकारे पार पडते, सुनेचे स्वागत चाळीत कशाप्रकारे होते याची एक विशेष झलक दाखवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ कांदिवलीचा आहे. कांदिवली पूर्व येथील गोकुळ नगरमध्ये त्रिवेणी सदर चाळ आहे. या चाळीत सागर आणि अर्चना या जोडप्याची वरात नाचत-गाजत येताना दिसते आहे. कोणी फटाके फोडून, तर कोणी बँजो वाजवून नाचत-गात या खास क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. एवढेच नाही तर मित्रांनी नवऱ्या मुलाला उचलून घेऊन घरापर्यंत आणले आहे. चाळीत वरातीत कशाप्रकारे मजा केली जाते, व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा…

हेच वाचा…‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video

व्हिडीओ नक्की बघा…

चाळीत कोणाच्याही घरात लग्न असो, अगदी साखरपुड्यापासून ते सून घरात येईपर्यंत चाळीतला प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यक्रमात, लग्न घरातील कुटुंबातील सदस्यांची मदत करतो आणि त्यांच्या आनंदातसुद्धा सहभागी होतो. व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पहिले असेल की, नवरा-नवरी लाल रिबन कापतात, नवरीच्या स्वागतासाठी लाल कार्पेट अंथरले आहे आणि त्यावर फुलांनी सजावट केली आहे. रंगीबेरंगी पताके उडवून लहान मुलांपासून ते मोठी मंडळी अगदी आनंदात नाचताना दिसत आहेत आणि नवरा-नवरी येताच गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि इथेच व्हिडीओचा शेवट झाला आहे.

‘सोहळा’ अख्खी चाळ साजरी करते

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @naav_maaz_sagar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘हा आनंद केवळ चाळीतच… ‘लग्न’ एकाच्या घरी असते, पण ‘सोहळा’ अख्खी चाळ साजरी करते’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनासुद्धा हा व्हिडीओ पाहून चाळीतले दिवस आठवले आहेत. ‘खूप भारी… भाग्यवान आहेस अर्चना, तुझे असे वेलकम झाले…आणि त्याहून भाग्यवान म्हणजे तुझ्याकडे चाळ नावाची फॅमिली आहे, अगदी खरं… खूप सुंदर वेलकम झाले, हीच तर ओळख आहे चाळीतली सर्व माणसे मिळून मिसळून राहतात. सर्वांची सुख-दुःख एकत्र वाटली जातात’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows grand welcome by chawl members to newly married couple with video will win your heart asp