Video Shows Granddaughter Give Grandfather Surprise : आजोबा आणि नात यांचं नातं खरंतर शब्दात मांडण्याच्या पलीकडचे आहे. घरातील लहान मुलांचे हट्ट सर्वात जास्त कोणाकडून पुरवले जात असतील तर ते आजी आजोबांकडूनच. त्यामुळे आई-बाबांचा ओरडा पडला की, आजी-आजोबांच्या मागे लपणे, त्यांना बागेत घेऊन जाणे, त्यांना शाळेत सोडायला घेऊन जाणे, गावी जाताना नातवाच्या हातावर पैसे ठेवणे आदी अनेक गोष्टी आजी-आजोबा नातवंडांसाठी करताना पाहायला मिळतात. पण, आज सोशल मीडियावर एका नातीने तिच्या आजोबांचा वाढदिवस खास केला आहे.

व्हायरल व्हिडीओत आजोबांचा वाढदिवस असतो. यासाठी त्यांची नात एक खास प्लॅन करते. आजोबा मार्केटमध्ये गेलेले असतात. ते येण्यापूर्वी ती गुलाबाच्या पाकळ्यांनी संपूर्ण घर सजवते. त्यानंतर आजोबा घरात येतात आणि पाहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते. गुलाबाच्या पाकळ्यांनी हॉलपासून ते बेडरूमपर्यंतचा रस्ता सजवलेला दिसतो आहे. आजोबा त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालत बेडरूमपर्यंत येतात. नक्की नातीने काय सरप्राईज ठेवलेले असते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

आपण त्यांना दररोज जपले पाहिजे (Viral Video) :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, आजोबा त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालत बेडरूमपर्यंत येतात आणि बघतात की, टेबलावर नातीने गुलाबांच्या पाकळ्यांच्या मधोमध एक दारूची बॉटल ठेवलेली असते. त्यानंतर फुग्यांची सजावट करण्यात आलेली असते, तिथे आजोबा येतात आणि केक कापतात आणि नात त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करते. नात आणि आजोबा दोघेही एकमेकांना केक भरवतात आणि अशाप्रकारे व्हिडीओचा गोड शेवट होतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @cute_kavya_gurbani आणि @gurbanidrushti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून ‘खरंच खूप गोड! फक्त त्यांच्या वाढदिवसादिवशीच नाही तर आपण त्यांना दररोज जपले पाहिजे, कारण ते आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि गोंडस लोक आहेत; ज्यांना फक्त आपले प्रेम हवे असते. मला तर माझ्या आजोबांची दररोज आठवण येते आणि त्यांची अनुपस्थिती अजूनही माझ्या आयुष्यात कोणीही भरून काढू शकत नाही’ आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.