Video Shows Grandfathers Dance To Granddaughter Haldi : घरातील लहान मुलांचे लाड, हट्ट सर्वांत जास्त कोणाकडून पुरवले जात असतील, तर ते आजी-आजोबांकडून. आजी-आजोबा आणि नातवंड हे एक जगातील सगळ्यात सुंदर नातं आहे. आई-वडिलांपेक्षा त्यांची मुले आजी-आजोबांकडे जास्त वेळ असतात. म्हणून या दोघांमध्ये कितीही अंतर असले तरीही नातवाचे पहिले मित्र हे आजी-आजोबाच असतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे आणि त्यामध्ये आजोबा आपल्या नातीबरोबर अगदी मनसोक्त नाचताना दिसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निक्की @dedha.2005 या इन्स्टाग्राम युजरच्या मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. त्यादरम्यान तिचे आजोबासुद्धा उपस्थित असतात. बॅकग्राऊंडमध्ये गाणे लागलेले असते आणि आजोबा जोरात शिटी मारून डान्स करण्यास सुरुवात करतात. आजोबांना नाचताना पाहून नातदेखील त्यांच्याबरोबर डान्स करण्यास सुरुवात करते. त्यानंतर घरातील इतर मंडळीसुद्धा आजोबा आणि नातीचा उत्साह वाढवत, टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ (Video) …

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, दिग्गज मोहम्मद रफी यांनी गायलेल्या फिरकीवाली या गाण्यावर आजोबा आणि नात ठेका धरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आजोबांचे आपल्या नातीबद्दलचे प्रेम दर्शवतो आहे. आजोबांच्या गाण्यावरील स्टेप्स, त्यांची डान्स करण्याची ऊर्जा आणि नातीने त्यांना डान्स करताना दिलेली साथ. तसेच आजोबांना नाचताना पाहून अन् कुटुंबातील सदस्यांचा उत्साह पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल एवढे तर नक्की.

आजोबा आणि नातीने धरला ठेका

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dedha.2005 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बाबा’ अशी कॅप्शन निक्कीने व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि मला माझ्या आजोबांची आठवण आली, हा व्हिडीओ बघून लग्नात आजोबांनी माझ्याबरोबर नाचावे, अशी माझी इच्छा आहे. कारण- माझे लग्न काही दिवसांवर आहे. असा क्षण फक्त नशीबवान लोकांच्या आयुष्यात येतो आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.