Viral Video Of Elderly Women : अनेक स्त्रिया घर सांभाळून नोकरी करतात. घरातील इतर कामं करून ऑफिसला जाण्यासाठी तयार होणं या सगळ्यात भरपूर वेळ जातो. त्यामुळे काही स्त्रिया प्रवासात म्हणजेच लोकलमध्ये मेकअप करताना दिसतात. तुम्ही अनेकदा महिला किंवा तरुणींना ऑफिसला जाण्यासाठी तयार होताना पाहिलं असेल. पण, तुम्ही कधी वृद्ध महिलेला मेकअप करताना पाहिलं आहे का? नाही… तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक वृद्ध महिला मेकअप करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एक वृद्ध महिला ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी दिसते आहे. पण, यादरम्यान एका वृद्ध महिलेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या वृद्ध महिलेच्या दोन्ही हातांत दोन पिशव्या आहेत. त्यातील एका पिशवीतून ती कॉम्पॅक्ट पावडर बाहेर काढते आणि लावण्यास सुरुवात करते. या वयातही आपण सुंदर दिसावं, टापटीप राहावं यासाठी त्या वृद्ध महिलेचा प्रयत्न दिसतो. या वयातसुद्धा स्वतःवर असणारं तिचं प्रेम पाहून, एका अज्ञात व्यक्तीनं तिचा व्हिडीओ शूट करून घेतला.
हेही वाचा…पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं ‘तेरे नैना’ गाणं, VIRAL VIDEO पाहून कौतुक कराल
व्हिडीओ नक्की बघा…
महिला आणि त्यांचे मेकअपवर असणारं प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान मेकअप करणं ही त्यांच्यासाठी खूप सामान्य गोष्ट आहे. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी दिसते आहे. वृद्ध महिला हातात दोन्ही पिशव्या घेऊन प्रवास करीत असते. यादरम्यान वृद्ध महिला बॅगमधून कॉम्पॅक्ट पावडर काढून मेकअपसुद्धा करते आहे. हे पाहून अज्ञात व्यक्तीनं या दृश्याचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मी ३० वर्षांनंतर अशी असेन…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (viral Video) @surya_s.s_004 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ‘प्रत्येकाचे स्वतःवर प्रेम असलं पाहिजे’ हे मत विविध शब्दांत मांडताना दिसत आहेत. तसेच मेकअप करायला आवडणाऱ्या काही मुली “मी ३० वर्षांनंतर अशी असेन”, “ट्रेनमध्ये सगळ्यांसमोर मेकअप करण्यासाठी इतका कॉन्फिडन्स हवा” असं म्हणताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि आजीचं कौतुक करताना युजर्स कमेंट्समध्ये दिसत आहेत.