Viral Video Shows Grandma Wore Grandsons Clothes To The Mixer: आई-बाबा नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे नातवंडांची जबाबदारी ही आजी-आजोबांवर असते. पण, थोड्या दिवसांसाठी नातू कुठे बाहेर गेला, तर या आजी-आजोबांना मात्र नातवंडांची भरपूर आठवण येते. आपल्या मुलांपेक्षा जास्त जपणे, मार्केटमध्ये भाजी आणायला त्यांना घेऊन जाणे, त्यांची आठवण आली की, मोबाईलमध्ये त्यांचा फोटो बघणे आदी अनेक गोष्टी आजी-आजोबा करताना दिसतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये नातवंडांच्या आठवणीत एक मजेशीर गोष्ट केली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) नक्की कुठला आहे याची माहिती कळू शकलेली नाही. व्हिडीओमध्ये एक आई स्वयंपाक करीत असते. पण, तिला तिच्या नातवाची आठवण येत असते. तेव्हा आईचा मुलगा व्हिडीओ शूट करीत स्वयंपाकघरात जातो आणि म्हणतो, “या किचनमध्ये ठेवलेल्या सगळ्या वस्तू मला कळतायत; पण हे काय आहे?” असे म्हणून तो मिक्सरकडे हात दाखवतो आणि “मिक्सर आहे की तुझा नातू’, असा प्रश्न आईला विचारतो. तेव्हा त्याची आई, “हा मिक्सरच आहे, ज्याला मी माझ्या नातवाचे कपडे घातले आहेत; पण यामागे दोन कारणे आहेत”, असं हसून म्हणते. तर, ही दोन कारणे कोणती ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Woman vulgar dance at tribute meeting video viral on social media
असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
emotional quote viral video rickshaw driver write heart touching best line for father
VIDEO : रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की, पाहून अनेकांना झाली वडिलांच्या कष्टाची जाणीव; लोक म्हणाले, “लाखात एक…”
Grandfather expressed his love To Grandmother
‘आमचं आय लव्ह यू…’ आजोबांनी हटके स्टाईलमध्ये प्रेम केलं व्यक्त; आजी लाजल्या अन्…, पाहा Viral Video
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका
Brother gifted a house worth fifteen lakhs to his sister emotional video goes viral on social media
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO

हेही वाचा…‘माझ्या कॅब ड्रायव्हरचा ड्रायव्हर…’चालकाला झोप आवरेना, मग प्रवाशाने केली ‘अशी’ मदत; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओ नक्की बघा…

तुम्ही व्हिडीओत ( Viral Video) पाहिले असेल की, आजीने मिक्सरला नातवाचा टी-शर्ट आणि मिक्सरच्या छोट्या भांड्याला नातवाची टोपी अगदी मजेशीर पद्धतीने घातलेली असते. आई असे करण्याची दोन मजेशीर कारणे सांगते. एक तर कपडे घाल्यामुळे मिक्सर खराब होणार नाही आणि दुसरे म्हणजे मिक्सरला घातलेले कपडे पाहून माझ्या चिकूची (नातवाची) आठवण येते, जो आता पुण्याला गेला आहे. हे ऐकून लेक हसून म्हणतो, “हा मिक्सर नाही माझ्या आईचा नातू आहे”, असे म्हणतो आणि व्हिडीओचा शेवट होतो.

तू नशीबवान आहेस

सोशल मीडियावर व्हायरल होणारा (Viral Video) हा व्हिडीओ @alka_rajput_patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मिक्सरला नातूचे कपडे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. मीपण असेच ठेवते, आयडिया छान आहे, आईचा नादच खुळा आहे, तू नशीबवान आहेस दादा तुला असे बोलणारी आई आहे, मागच्या पिढीतील काही लोक निर्जीव वस्तूलाही आपल्या जवळच्या नात्यासारखं वागवतात, मिक्सरला थंडी लागू नये याची काळजी घेतली आहे, मीपण असंच ठेवते, अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

Story img Loader