Video Shows Grandmother Dancing On Hawa Hawaii Song : पूर्वी फक्त वरातीत सगळे मनोसोक्त नाचायचे. पण, आता लग्न म्हटले की, डान्सशिवाय अपूर्णच. आता ते दिवस राहिले नाही, जेव्हा नवरी तिच्या लग्नाच्या दिवशी खिडक्यांमधून नवऱ्याची वरात येताना पाहत असायची. कारण लग्नाच्या अनेक कार्यक्रमांत ‘संगीत’ कार्यक्रमसुद्धा जोडला गेला आहे. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि नवरा-नवरी सगळेच आपली डान्स करण्याची हौस पूर्ण करून घेतात; तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबईत राहणारी इन्स्टाग्राम युजर राजवी गांधीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या भावाच्या लग्नाचा संगीत कार्यक्रम सुरू असतो. या कार्यक्रमात राजवी गांधीने एक डान्स सादर केला आहे. ‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है’ या गाण्यावर राजवी गांधी डान्स करण्यास सुरुवात करते. ती गाण्याच्या बोलांवर जबरदस्त डान्स करत असते, तितक्यात गाणं बंद केले जाते. नंतर काय घडते? कोणाची या डान्समध्ये एंट्री होते, व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, भावाच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात बहीण ‘ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है’ गाण्यावर डान्स करत असते, तितक्यात तिच्या आजीची एंट्री होते. ‘मिस्टर इंडिया’मधलं श्रीदेवी यांचं ‘हवा-हवाई’ गाणं वाजतं आणि आजी त्याच्यावर डान्स करण्यास सुरुवात करते आणि उपस्थितांमध्ये एकच उत्साह दिसू लागतो. नात आणि आजी दोघीही या गाण्यावर डान्स करतात आणि संगीत कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि डान्स झाल्यावर सगळे टाळ्या वाजवून दोघींचे कौतुक करतात.
खूप छान सरप्राईज दिले
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rxjvee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माझ्या क्युट आजीने माझ्या परफॉर्मन्सला क्रॅश करून आश्चर्यचकित केले’; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आजीच्या प्रेमात पडले आहेत. ‘एखादी लहान मुलगी नाचते आहे असे वाटते आहे, किती छान डान्स केला, खूप छान सरप्राईज दिले, संगीत कार्यक्रमातील सगळ्यात बेस्ट डान्स’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.