Viral Video Of Tauba Tauba song : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटातील ‘तौबा तौबा हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं आहे. या गाण्यातील विकी कौशलच्या हूक स्टेप , त्याच्या हटके हावभावने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ठेका धरायला भाग पाडलं आहे. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आजीबाईंचा एक ग्रुप हटके स्टेप्स करताना दिसून आला आहे.
व्हायरल व्हिडीओची सुरुवात एक आजी गॉगल डोळ्यांना लावून उभी आहे अशी होते. नंतर एकसारख्या साड्या नेसलेल्या सहा आजीबाईंची दिसू लागतात. पुढे तिघी तर मागे तिघी असं उभं राहून सहा आजी डान्स करण्यास सुरुवात करतात. ‘तौबा तौबा गाणं सुरु होतं आणि मग आजींचा ग्रुप हूक स्टेप करण्यास सुरुवात करतो. सर्व आजीबाईंचा या वयात डान्स करण्याचा उत्साह, त्यांची आवड पाहून तुम्हीही कौतुक कराल एवढं नक्की. तौबा तौबा गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एका मोकळ्या परिसरात सहा आजीबाई डान्स करण्याच्या तयारीत आहे. ग्रुपच्या मध्ये उभं राहणाऱ्या आजीबाईंनी डोळ्यांवर गॉगल लावला आहे. तसेच सर्व आजींनी एकसारख्या साड्या नेसल्या आहेत. ‘तौबा तौबा गाणं सुरु होताच सर्व आजी विकी कौशलप्रमाणे स्टेप्स करण्यास सुरुवात करतात. त्यांच टीम बॉण्डिंग, एकत्र स्टेप्स करण्याची वेळ, हावभाव, त्यांची व्हिडीओतील सादगी पाहून तुम्हीही नक्कीच इम्प्रेस व्हाल व विकी कौशलने केलेल्या स्टेप्सही काही क्षणासाठी विसरून जाल एवढं नक्की.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shantai_second_childhood या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तौबा तौबा’ असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. नेटकरी या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘आजच्या दिवसातला सगळ्यात बेस्ट व्हिडीओ’. तर दुसरा यूजर म्हणतोय की, ‘सगळ्या आजीबाईंनी व्हिडीओत कमाल केली आहे’. तर तिसरा युजर म्हणतोय की, ‘या गाण्याचं सगळ्यात बेस्ट व्हर्जन’ आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.