Viral Video : हत्ती हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. अनेकदा हत्ती एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी देवदूत म्हणून उभा राहतो; तर कधी तो सर्कसमध्ये स्तिमित करणारे कौशल्य दाखवतो. अनेकदा त्याची माणसांबरोबर लगेच मैत्री होते. अशा अनेक गोष्टी आपण हत्तीबद्दल ऐकल्या असतील आणि सोशल मीडियावर त्याबाबतचे व्हिडीओही बघितले असतील. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे; जो पाहून तुम्ही सगळेच थक्क व्हाल. कारण- तरुणींच्या एका समूहाबरोबर एक हत्तीही थिरकताना दिसला आहे.

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एनिमी’ या तमीळ चित्रपटातील ‘टम टम’ गाणं इन्स्टाग्रामवर तुफान चाललं. इन्स्टाग्रामवर तुम्ही या गाण्यावरील असंख्य रील्स पाहिले असतील. या गाण्यावर सामान्य नागरिकांपासून ते बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण थिरकले आहेत. पण, आजच्या व्हिडीओत हत्ती तरुणींच्या एका गटाबरोबर या गाण्यावर थिरकताना दिसला आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कर्नाटकचा असून, येथे काही तरुणी साडी नेसून उद्यानात गेल्या आहेत. कशा प्रकारे हा डान्स केला गेला ते तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Boy wrote funny Message behind his bike for Friend funny photo goes viral
PHOTO: “बायकोने मला…” सारखी गाडी मागणाऱ्या मित्रांसाठी पठ्ठ्याने बाईकच्या मागे लिहला जबरदस्त मेसेज; वाचून पोट धरुन हसाल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
Dance video done by grandparents in kolhapur on marathi song halagi tune is currently going viral on social media
कोल्हापूर म्हणजे नादच खुळा! आजी अन् आजोबा हलगीवर जबरदस्त थिरकले; एका VIDEO मुळे झाले फेमस
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO

हेही वाचा…Mahindra Thar Roxx Clocks: ६० मिनिटांत १.७६ लाख बुकिंग! तुफान ट्रेडिंगवर असणाऱ्या महिंद्रा थार ROXX ची फीचर्स अन् किंमत जाणून घ्या…

व्हिडीओ नक्की बघा…

मंत्रमुग्ध करणारा क्षण :

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, उद्यानात प्रत्येक प्राण्यासाठी राहण्याची वेगवेगळी सोय केलेली असते. तशी या उद्यानातदेखील हत्तीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी सहा तरुणी साडी नेसून उद्यानात आल्या आहेत आणि ‘टम टम’ गाण्यावर रील शूट करताना दिसत आहेत. गाणं वाजताच तरुणींचा डान्स सुरू होतो. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तरुणींना डान्स करताना पाहून हत्तीदेखील डान्स करण्यास सुरुवात करतो. हत्ती हलत-डुलत, कधी पाय, तर कधी सोंड हलवत गाण्यावर ठेका धरतो; जे पाहायला खूपच सुंदर वाटते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @mangalore_budding_talentss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच उद्यानातील अधिकाऱ्यांकडून ही रील शूट करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्यात आली होती, असे स्पष्ट करून, ‘हत्तीच्या आकर्षक ऊर्जेने या गाण्यात आणखीन भर घातली. हत्तीच्या हालचाली सुंदर होत्या; जणू ते हवेत तरंगत होते. हा खरोखरच एक मंत्रमुग्ध करणारा क्षण आहे; ज्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

Story img Loader