Viral Video : हत्ती हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. अनेकदा हत्ती प्राण वाचवण्यासाठी देवदूत म्हणून उभा राहतो तर कधी सर्कसमध्ये आपलं कौशल्य दाखवतो, माणसांबरोबर अनेकदा त्याची लगेच मैत्री होते, अशा अनेक गोष्टी आपण हत्तीबद्दल ऐकल्या असतील आणि सोशल मीडियावर व्हिडीओही बघितले असतील. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे; जो पाहून तुम्ही सगळेच थक्क व्हाल. कारण तरुणींच्या एका ग्रुपबरोबर हत्ती थिरकताना दिसला आहे.

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एनिमी’ या तमिळ चित्रपटातील ‘टम टम’ गाणं इन्स्टाग्रामवर तुफान चाललं. इन्स्टाग्रामवर तुम्ही या गाण्यावर असंख्य रिल्स पाहिले असतील. या गाण्यावर सामान्य नागरिकांपासून ते बरेच बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत अनेक थिरकले आहेत. पण, आजच्या व्हिडीओत हत्ती तरुणींच्या एका ग्रुपबरोबर या गाण्यावर थिरकताना दिसला आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कर्नाटकचा असून येथे काही तरुणी साडी नेसून उद्यानात गेल्या आहेत. कशाप्रकारे हा डान्स करण्यात आला तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…Mahindra Thar Roxx Clocks: ६० मिनिटांत १.७६ लाख बुकिंग! तुफान ट्रेडिंगवर असणाऱ्या महिंद्रा थार ROXX ची फीचर्स अन् किंमत जाणून घ्या…

व्हिडीओ नक्की बघा…

मंत्रमुग्ध करणारा क्षण :

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, उद्यानात प्रत्येक प्राण्यासाठी राहण्याची वेगवेगळी सोय केलेली असते. तसेच या उद्यानात देखील हत्तींसाठी करण्यात आली आहे. तर त्याचठिकाणी सहा तरुणी साडी नेसून उद्यानात आल्या आहेत आणि ‘टम टम’या गाण्यावर रील शूट करताना दिसत आहेत. गाणं वाजताच तरुणींचा डान्स सुरु होतो,पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे तरुणींना डान्स करताना पाहून हत्ती देखील डान्स करण्यात सुरुवात करतो. हत्ती हलत-डुलत, कधी पाय तर कधी सोंड हलवत गाण्यावर ठेका ठरतो ; जे पाहायला खूपच सुंदर आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mangalore_budding_talentss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच उद्यानातील अधिकाऱ्यांकडून ही रील शूट करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्यात आली होती असे कॅप्शनमध्ये सांगत.’ हत्तीच्या त्यांच्या आकर्षक उर्जेने या गाण्यात आणखीन भर घातली. हत्तीच्या हालचाली सुंदर होत्या, जणू ते हवेत तरंगत होते. हा खरोखरच एक मंत्रमुग्ध करणारा क्षण आहे ; ज्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.