Viral Video Shows Haldi Kunku Celebration At Mumbai Local :मुंबईची सगळ्यात खास ओळख म्हणजे ‘मुंबई लोकल’. येथे पहिल्या ट्रेनपासून ते अगदी शेवटच्या ट्रेनपर्यंत प्रत्येक प्रवासी वेगवेगळ्या जवाबदाऱ्या घेऊन प्रवास करत असतो. कोणी सकाळी उठून नोकरीवर जाण्यासाठी, तर कोणी ट्रेनमध्येच त्याचा छोटासा व्यवसाय करीत असतो. या ट्रेनमध्ये विविध कारणांवरून सतत भांडणे तर होतच असतात; पण येथे काही शारीरिक त्रास झाल्यावर सावरून घेणारीसुद्धा हीच माणसे असतात. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. त्यामध्ये मुंबई लोकलमध्ये चक्क हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) मुंबई लोकलचा आहे. घरात, हॉलमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरा होताना आपण अनेकदा पाहतो. पण, आज महिलांनी मिळून ट्रेनमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्याचे ठरविले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की, खिडकीवर एक छोटा पतंग लटकवण्यात आला आहे आणि त्याच्यावर हळदी-कुंकू, असा मजकूर लिहिला आहे. महिला एकमेकींना हळद-कुंकू लावून अस्टरची फुले आणि वाण देताना दिसत आहेत. ट्रेनमधला खास हळदी-कुंकू व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
ट्रेनमध्ये दररोज प्रवास करताना एकाच ट्रेनमध्ये, एकाच वेळी अनेक जण आपल्याबरोबर प्रवास करतात. यादरम्यान अनेकांशी आपली ओळख होते आणि ही ओळख हळूहळू मैत्रीमध्ये रूपांतर जाते आणि मग हा गट वाढदिवस दसऱ्याला असू देत किंवा आणखीन कोणता सण ट्रेन व ट्रेनच्या डब्यांची सजावट करतात आणि करून तो दिवस आणखीन विशेष करतात. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आज महिलांनी मिळून हळदी-कुंकू समारंभ ट्रेनमध्ये साजरा केला आहे आणि हा प्रवास आणखीन खास केला आहे.
मुंबई लोकलमध्ये हळदी-कुंकू समारंभ
महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन करतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sayli_moonchild या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मुंबई लोकलमध्ये हळदी-कुंकू समारंभ’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढताना उतरताना धक्काबुक्की, अनेकदा भांडण, तर अक्षरशः मारामारीसुद्धा होते. पण, या सगळ्यात हा व्हिडीओ खूप अनोखा आहे.