लॉजिकली फॅक्टस

झारखंडमध्ये यंदा दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा काल १३ नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. पण, झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये ते राज्यात ‘मोफत कफन’ देण्याची घोषणा करताना दिसत आहेत. आगामी निवडणुकांसंदर्भात हेमंत सोरेन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक युजर्स शेअर करताना दिसत आहेत.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
Chandrapur district Cash, liquor, drugs seized,
चंद्रपूर: रोकड, दारू, ड्रग्ज जप्त
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

नक्की काय होत आहे व्हायरल?

एका एक्स (ट्विटर) युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच “झारखंडच्या जनतेला मुख्यमंत्री मोफत कफन देणार, वाह मुख्यमंत्री. घोषणा करण्याच्या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी या घोषणेचा अर्थ समजून घेण्याचाही तुम्ही प्रयत्नही केला नाही”; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://x.com/Teesaribaar2528/status/1856161837689254369

https://archive.ph/0Alqq

https://archive.ph/MlOso

https://archive.ph/D4Z29

https://archive.ph/4KZtc

पण हा व्हिडीओ अलीकडील नाही, तर २०२१ मध्ये करोना काळातील लॉकडाऊनदरम्यानचा आहे; जेव्हा हेमंत सोरेन यांनी लोकांना अंतिम संस्कारांसाठी मोफत कफन देण्याची घोषणा केली होती.

तपास :

जेव्हा आम्ही हेमंत सोरेन यांच्या व्हिडीओचा कीवर्डद्वारे शोध घेतला तेव्हा आम्हाला, मे २०२१ च्या अनेक बातम्यांमध्ये हा व्हिडीओ आढळला. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अंत्यसंस्कारासाठी मोफत कफन देण्याची घोषणा केली होती.

२५ मे २०२१ रोजी यूट्यूबवर शेअर केलेल्या झी न्यूजच्या व्हिडीओमध्ये हेमंत सोरेन यांचा व्हायरल व्हिडीओ उपलब्ध आहे, ज्यामध्ये भाजपाने झारखंड सरकारच्या निर्णयावर टीका करत म्हटले की, लोकांना मोफत औषधे, लस, राशन देण्याऐवजी मोफत कफन देणार आहेत; तर यावेळी सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने यावर प्रत्युत्तर दिले होते.

हेही वाचा…हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट

मे २०२१ मध्ये झारखंड सरकारच्या मोफत कफन देण्याच्या घोषणेबद्दल न्यूज १८ बिहार झारखंड, द न्यू इंडियन एक्स्प्रेस, जनसत्ता यांसह अनेक प्रमुख माध्यमांनी याबद्दल बातम्यांमध्ये लिहिलं आहे. हेमंत सोरेन यांनी ही घोषणा करोनाची दुसरी लाट आली त्यादरम्यान दिली होती, असं स्पष्ट केलं आहे.

२५ मे २०२१ रोजीच्या हिंदुस्थानच्या अहवालात झारखंड सरकारचे अर्थमंत्री रामेश्वर ओराँव यांच्या मार्फत लिहिण्यात आलं आहे की, लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने लोकांना कफन खरेदी करण्यात अडचणी येत होत्या. तसेच, याशिवाय कोणत्याही अलीकडील अहवालात हेमंत सोरेन यांनी कफन मोफत देण्याचे विधान केलं आहे असे आम्हाला आढळले नाही.

झारखंड विधानसभा निवडणुका २०२४ साठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या जाहीरनाम्यात अशा कोणत्याही घोषणेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

निष्कर्ष : आतापर्यंतच्या आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडीओ मे २०२१ चा आहे. तसेच या व्हिडीओचा झारखंड विधानसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही आणि हेमंत सोरेन यांनी निवडणुकीसंदर्भात अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

(ही कथा मूळतः लॉजिकली फॅक्टसने पब्लिश केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)

https://www.logicallyfacts.com/hi/fact-check/old-video-of-hemant-soren-announcing-free-shrouds-goes-viral-ahead-of-jharkhand-elections-2024