Viral Video Shows Police Orchestra On Tere Naina Song : आंदोलन, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, निवडणूक असतील तेव्हा प्रत्येक ठिकाणी शहरात कायदा आणि सुवव्यस्था राखण्याचे काम पोलीस करत असतात. नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव, तर वाहनचालकांना वाहतुकीचे नियम ते वेळोवेळी अनोख्या पद्धतीने सांगताना दिसतात. अशातच रोजच्या दैनंदिन कामातून वेळ काढून त्यांनाही काहीतरी वेगळं करण्याची इच्छासुद्धा होतच असेल ना? आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांचे अनोखे रूप त्यातून पाहायला मिळाले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हिमाचल प्रदेशचा आहे. हिमाचल प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांचा एक खास ऑर्केस्ट्रा सादर केला जात आहे. बॉलीवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचा २०१० मधील ‘माय नेम इज खान’ हा हिट चित्रपट खूप हिट झाला. या चित्रपटातील ‘तेरे नैना’ हे गाणे आपल्यातील अनेकांनी ऐकले असेल. पण, तुम्ही कधी या गाण्यावर ऑर्केस्ट्रा सादर केला गेल्याचे पाहिले आहे का? नाही… तर आज पोलीस अधिकाऱ्यांनी सादर केलेला ऑर्केस्ट्रा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

हेही वाचा…‘एक कॉफी फ्री…’ कॅफेत येणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर; VIRAL VIDEO पाहून कराल कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

तेरे नैना

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, पोलीस अधिकारी स्टेजवर उभे आहेत. अनेक जण त्यांचा हा खास कार्यक्रम पाहण्यासाठी जमले आहेत. त्यानंतर एक पोलीस अधिकारी हातात गिटार घेऊन उभा असतो. काही जण बँजो वाजवण्यास सुरुवात करतात; तर काही जण महिला अधिकाऱ्यांबरोबर ‘तेरे नैना’ हे गाणे गातात आणि जमलेल्या माणसांना त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करतात. तसेच त्यांचे ताल, सूर ऐकून तुम्हीही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही एवढे नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vijaykumarkhakhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तेरे नैना’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ‘पोलीस रॉक, पब्लिक शॉक’, ‘खूप छान’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दररोज गुन्हेगारांना पकडणाऱ्या, इतरांसाठी धडपडणाऱ्या, स्वतःचा आनंद विसरून दुसऱ्याच्या सुखात सामील होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे हे अनोखे रूप सगळ्यांनाच थक्क करणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Story img Loader