Viral Video: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलमध्ये नवनवीन शोभेच्या वस्तू ठेवल्या जातात. यामुळे जेवणाबरोबरच आजूबाजूचा परिसर पाहून ग्राहकांचे मन आणखीन प्रसन्न होते. मग यामध्ये फ्रेम, काही पेंटिंग; तर आणखीन बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही आतापर्यंत अनेक हॉटेल आणि त्यांचे इंटिरिअर पाहिले असतील. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एका हॉटेलमधील अनोख्या पंख्यांनी ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काय आहे या पंख्यांमध्ये खास, चला जाणून घेऊ.
व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. बंगळुरूच्या एका हॉटेलने ग्राहकांना आकर्षित केलं आहे. हे हॉटेल तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल. कारण सोनेरी व पांढऱ्या रंगकाम केलेल्या हॉटेलमध्ये अनेक फ्रेम्स, विविध जुन्या गोष्टी तर आहेतच; पण या सगळ्यात येथील पंख्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या हॉटेलने जुन्या पारंपरिक पंख्यांना परत आणून त्यांना आताचा मॉडर्न इलेक्ट्रिक ट्विस्ट देण्यात आला आहे. नक्की कोणत्या स्टाईलचे पंखे लावण्यात आले आहेत, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…VIDEO: असा स्टंट कोण करतं? दोन वेगवान कारवर उभा राहिला अन्… ‘त्याचा’ हा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा…
आयताकृती पंखे (Viral Video Shows rectangular fans) :
पूर्वी आयताकृती पंखे विजेवर चालत नसून हवेच्या सहाय्याने चालत होते. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विजेवर काम करणाऱ्या, मोटारवर चालणाऱ्या; पण प्राचीन दिसणाऱ्या आयताकृती पंख्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हॉटेलमध्ये एकाही टेबलवर ग्राहक बसलेले दिसले नाहीत. पारंपरिक असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये असे अनेक पंखे आहेत, ज्यात सजावटीच्या ऑफ-व्हाइट फॅब्रिकचे सोनेरी टॅसेल्स आहेत. आयताकृती पंखे विजेच्या मदतीने हलत आहे, जे हॉटेलच्या सजावटीला अगदी शोभून दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Bobbycal या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बंगळुरू येथील हॉटेलमध्ये पंख्यांचा नवीन प्रकार. जीवन हे एक वर्तुळ आहे,” अशी कॅप्शन देऊन सुरेंद्र तापुरिया यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला ७.५ लाख व्ह्यूज, नऊ हजारपेक्षा जास्त ‘लाइक्स’ मिळाले आहेत. पारंपरिक फॅनला मॉडर्न ट्विस्ट दिल्यामुळे अनेक ग्राहक या हॉटेलच्या सजावटीची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तर काही जणांना हे पंखे पाहून हॉरर चित्रपटांची आठवण आली आहे असे ते म्हणत आहेत.