School Annual Day Function : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक शाळा दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करत असते. यामध्ये विज्ञान, चित्रकला स्पर्धा, हस्तकला, कार्यानुभव, क्रीडामहोत्सव आणि सगळ्यांचा आवडता ‘वार्षिकोत्सव’सुद्धा असतो. या वार्षिकोत्सव कार्यक्रमात शाळेतील प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थी सहभाग घेतात आणि डान्स, नाटक, ऑर्केस्ट्रा सादर करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, यामध्ये शाळेतील वार्षिकोत्सवाआधी प्रत्येक शाळेत कशी तयारी केली जाते याचे खास क्षण व्हिडीओत दाखवले आहेत.
वार्षिकोत्सव कार्यक्रम सुरू होण्याआधी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचा सराव (प्रॅक्टिस) घेतला जातो. काही शिक्षक विद्यार्थ्यांना डान्स शिकवतात, तर काही विद्यार्थी स्वतःच त्यांच्या आवडीच्या गाण्यावर डान्स बसवतात. डान्स प्रॅक्टिस करण्यासाठी तासनतास वर्गाच्या बाहेर असतात. तसेच वार्षिकोत्सवाला डान्स सादर करण्यापूर्वी रंगीत तालीम घेतली जायची. त्यानंतर अखेर वार्षिकोत्सवचा दिवस यायचा. वर्गातील शिक्षिका एक फाउंडेशन आणि लिपस्टिक घेऊन यायच्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तयारसुद्धा करायच्या. तर या सगळ्या गोष्टी ऑडिओ क्लिपद्वारे या व्हायरल व्हिडीओत सांगण्यात आल्या आहेत. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video).
व्हिडीओ नक्की बघा…
पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा
व्हायरल व्हिडीओ गुजरातचा आहे. शाळेच्या मैदानात गणवेशात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सराव (प्रॅक्टिस) करताना दिसत आहेत, तर शिक्षिका वेळोवेळी त्यांना प्रशिक्षण देते आहे. तसेच वार्षिकोत्सवात भाग न घेतलेले विद्यार्थी प्रॅक्टिसच्या नावाखाली वर्गाबाहेर आलेलेसुद्धा दिसत आहेत. तर @hanishka_world कंटेंट क्रिएटरने शाळेतील प्रॅक्टिसदरम्यानचा हा व्हिडीओ शूट करून घेतला आहे आणि त्यांच्या शाळेच्या आठवणी सांगत हा ऑडिओ क्लिप व्हिडीओला जोडला आहे, जे ऐकून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस नक्कीच आठवतील.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hanishka_world आणि @Shubhamyadav_70 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनासुद्धा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या शाळेतील दिवस आठवले आहेत. ‘संगणक शिकवणाऱ्या शिक्षिका १५० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ग्लिटर (Glitter) लावायच्या’ आदी मजेशीर आठवणी अनेक जण कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.