Viral Video : आयुष्यात वडिलांचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. जिथे आई आपल्याला प्रेम, आपुलकी देते, तिथे वडील जीवनात एखादी गोष्ट कशी सध्या करायची यासाठी प्रेरणा देत असतात. बाबा मुलांच्या वाढदिवसाला केक, भेटवस्तू, नवीन कपडे खरेदी करून देतील. पण, स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अजिबात दाखवणार नाहीत. त्यामुळेच बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी त्यांची मुले त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये लेकाने बाबांना एक छोटेसे सरप्राईज दिले आहे; पण ते अगदीच लाखमोलाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. बाबांचा वाढदिवस असतो. त्यामुळे लेकाला त्याच्या बाबांसाठी काहीतरी खास करायचे असते. मग, त्याला एक कल्पना सुचते. बाबांची कामावरून घरी येण्याची वेळ लेकाला माहिती असते. ती लक्षात ठेवून तो केक आणतो आणि बाबांच्या घरी येण्याच्या वेळेत दाराच्या मागे लपून राहतो. लेक दरवाजाच्या मागे हातात केक घेऊन उभा राहतो. त्यानंतर बाबा घरी येतात. लेकाने दिलेले सरप्राईज पाहून बाबांच्या चेहऱ्यावर कसा आनंद झळकला ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

व्हिडीओ नक्की बघा…

प्रत्येक जखमेवरचं बाबा हे एकच औषध :

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, लेक बाबांसाठी हातात केक घेऊन उभा आहे. बाबा कामावरून घरी येतात. तेव्हा लेक केक घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. बाबा हातातले सामान घरात खाली ठेवून केक हातात घेतात आणि चिमुकल्याला अलगद मिठी मारून, त्याच्या कपाळाचे चुंबन घेतात. त्यानंतर केकवरील मेणबत्ती फुंकतात. अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने लेकाद्वारे बाबांचा वाढदिवस साजरा होतो. या सगळ्यादरम्यान बाबांच्या डोळ्यांतील आनंद बघण्यासारखा असतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lolita या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भूवुक होऊन बाबा व चिमुकल्याच्या नात्याचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “आपल्या प्रत्येक जखमेवरचं बाबा हे एकच औषध आहे.” तर दुसरा म्हणतोय, “असे व्हिडीओ पाहण्यासाठी मी मोबाईलमध्ये रिचार्ज करतो.” तसेच, “वाढदिवसाचे बेस्ट सेलिब्रेशन”, “बाबांच्या डोळ्यातला आनंद बघण्यासारखा आहे’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows how boy gave a surprise to the father with cake heartwarming video melt your heart asp