Viral Video Shows How Rubber Bands Made: रबर बँड ही प्रत्येक घरात आढळणारी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. केस बांधण्यासाठी ते एखादी खाद्यपदार्थाची पिशवी बांधून ठेवण्यासाठी आपल्यातील अनेक जण रबर बँडचा उपयोग करतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, पाच ते १०-१५ रुपयांना मिळणारा हा रबर बँड नक्की कसा बनवला जात असेल? हे आज आपण व्हायरल व्हिडीओतून पाहू शकतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की, एवढी मेहनत करून बनवला जाणारा हा रबर बँड इतक्या स्वस्तात का विकला जातो?

सलोव भारद्वाज (@foodiee_sahab) नावाच्या एका इन्स्टाग्रामच्या कंटेन्ट क्रिएटरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. पाच ते दहा रुपयांना मिळणारे हे रबर बँड बनवण्यासाठी देशातील हजारो लोक रात्रंदिवस मेहनत करतात. व्हिडीओची सुरुवात रबराच्या झाडाच्या खोडावर चिरा बनवण्यापासून सुरू होते. चिरा बनवल्यानंतर काही वेळाने झाडातून द्रव टपकू लागतो, जो नंतर लहान कंटेनरमध्ये गोळा केला जातो. त्यानंतर यामध्ये विविध वस्तू मिक्स केल्या जातात. त्यानंतर हे मिश्रण एका ड्रममधून दुसऱ्या ड्रममध्ये ओतले जात आहे. नक्की कसे बनवले जात आहेत रबर बँड व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Low back pain: If you have lower back pain, stay a mile away from this food item
Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं ऐका आणि ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
How When and Where to Watch Apple iPhone 16 Launch Event
Apple iPhone 16 Launch Event 2024 : आयफोन १६ ची किंमत किती असणार? वेळ, तारीख अन् कुठे बघता येईल लाइव्ह जाणून घ्या
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Rasmalai Modak Easy Recipe
Ganeshotsav 2024 : यंदा बाप्पासाठी बनवा ‘रसमलाई मोदक’; VIDEO तून पाहा सोप्पी पद्धत; रेसिपी लिहून घ्या पटकन

हेही वाचा…अरे हे काय? साडी न दिल्याने पत्नीने थेट केली तक्रार; मजेशीर प्रकरणावर कसा निघाला तोडगा; कुठे घडली घटना? घ्या जाणून

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मिश्रण एका ड्रममधून दुसऱ्या ड्रममध्ये ओतले जात आहे. या प्रत्येक ड्रममध्ये वेगवेगळे रंग टाकले आहेत. नंतर मिश्रणात अनेक रॉड्स (दांड्या) बुडवल्या आहेत, त्यामुळे ड्रमधील द्रव पदार्थ त्या रॉड्सवर (दांड्याना) चिटकतो. मग ते सुकवण्यासाठी प्लास्टिकवर ठेवले जातात. एकदा हे व्यवस्थित सुकलं, की रबर रॉड्सपासून वेगळे केले जातात आणि मशीनच्या साहाय्याने त्याचे छोटे तुकडे केले जातात. नंतर रबर बँडमध्ये एक द्रव मिसळला जात आहे, जेणेकरून ते चमकदार दिसतील. म्हणून त्याला काही वेळ सूर्यप्रकाशात ठेवलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodiee_sahab या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून त्याला ३.४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला १४ लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली की, ‘रबर बँड बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण ते खूप स्वस्त विकले जातात; हे खूप विचित्र आहे.” आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.