How To Get Chilled Water Without Refrigerator : उन्हाळ्याच्या दिवसांत सतत पाणी प्यावंसं वाटतं. थंडगार पाणी प्यायल्याशिवाय चैन पडत नाही, त्यामुळे फ्रिजमध्ये आपण न चुकता पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतो. पण, लाईट गेल्यावर कोमट पाणी प्यावे लागते, तसेच अनेकांना फ्रिजमधील गार-गार पाणी पिऊन सर्दीसुद्धा होते, त्यामुळे काही जण आजही पारंपरिक मातीच्या माठातील पाणी पिण्याला पसंती देतात, त्यामुळे अनेक जण बाजारातून मातीचे माठ घरी घेऊन येतात. तर आज इन्स्टाग्रामवर एका युजरने माठ वापरून पाणी थंड ठेवण्याचा एक सोपा मार्ग दाखवला आहे.

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, मातीच्या भांड्यातून थंडगार पाणी मिळविण्यासाठी तुम्हाला व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि मिठाची गरज आहे. एक चमचा व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि मीठ घ्या, ते पाण्यात मिसळा आणि या द्रावणाने तुमचा मटका पूर्णपणे घासून घ्या. घासून झाल्यावर तो चांगला धुवून घ्या. यामुळे मटक्यात लहान छिद्रे असतात, जी कालांतराने बंद होऊ शकतात, ज्यामुळे पाणी थंड करण्याची क्षमता कमी होते. ही साफसफाईची पद्धत त्या छिद्रांना उघडण्यास मदत करते; असे कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. एकदा बघाच हा जबरदस्त जुगाड…

व्हिडीओ नक्की बघा…

तर या प्रक्रियेमुळे पाणी नेहमीपेक्षा चार पट थंड होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओतील ही खास ट्रिक पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. कोणी या ट्रिकला वेळ वाया घालवणं म्हणतंय, तर कोण प्रशंसा करताना दिसतंय; तर एका युजरने ‘सर, मी तुमच्या पद्धतीला फॉलो करून पाहिले. आता माझ्या भांड्यात बर्फ जमायला लागला आहे. आता मी काय करू; अशी मजेशीर कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @juju__saiyad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने ‘त्याऐवजी तुमचा मटका नियमितपणे धुवा, तो थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर, चांगल्या हवेशीर जागेत ठेवा, तो स्वयंपाकघरातील काउंटर किंवा रेफ्रिजरेटरजवळ ठेवू नका. तो स्वच्छ ठेवा, त्यामुळे तुमचे पाणी थंड राहील’; अशी उपयुक्त टीप दिली आहे. तर तुम्हाला यातील कोणती टीप उपयुक्त वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा…