Video Shows To Make Chakali : दिवाळी म्हटले की, सगळीकडे दिव्यांचा लख्ख प्रकाश, रंगीबेरंगी कंदिलाची सजावट, दारात रांगोळी आणि नाश्त्याला फराळ. प्रत्येकाला फराळातील वेगवेगळा पदार्थ आवडत असतो. कोणाला लाडू, कोणाला शंकरपाळी, कोणाला करंजी, तर कोणाला चकली. चकली सकाळी व संध्याकाळी चहाबरोबर, तर कधी स्नॅक्स म्हणूनसुद्धा अगदी आवडीने खाल्ली जाते. काही नोकरदार स्त्रियांच्या घरांमध्ये बाहेरून तयार फराळ विकत आणला जातो. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत चकली कारखान्यात कशी तयार केली जाते हे दाखविले आहे.

फराळ बनविताना चकली बनवण्याचे काम अनेकांना मजेशीर व सोपे वाटते. कारण- भाजणीची चकली बनविण्यासाठी साच्यात पीठ टाकून गोलाकार आकारात चकल्या पाडायच्या असतात. पण, व्हायरल व्हिडीओत (Viral Video) साच्याद्वारे चकल्या पाडणं स्किप करण्यात आलं आहे. व्हिडीओत कारखान्यातील कामगार चकल्या बनविताना दिसत आहेत. कामगार एका टेबलावर बसला आहे. पण, चकली गोलाकार बनविण्यासाठी एका मशीनचा वापर करण्यात आला आहे. नक्की कशा प्रकारे मशीनद्वारे चकली गोलाकार बनविली जात आहे ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

इथे आपण फ्रीमध्ये इंटर्नशिप करू शकतो

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, कामगार टेबलावर बसला आहे आणि गाणी ऐकत चकली बनवतो आहे. समोर चकल्यांचे पीठ एका छोट्या मशीनजवळ येते आहे. मग चकलीला मशीनद्वारे गोल आकार दिला जात आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे हे करताना कामगाराला हातसुद्धा लावावा लागत नाही आणि काही सेकंदांत गोल चकली तयार झाल्याचे दिसते आहे. यादरम्यान ज्या चकलीला गोल आकार मिळालेला नाही, ती पुढे ढकलली जाते आणि जी चकली व्यवस्थित गोलाकार झाली आहे, ती उचलून एका ताटात ठेवली जात आहे. अशा प्रकारे मशीनद्वारे चकल्या बनवल्या जात आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chhotu_baba_9906 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ आणि चकली बनविण्याची मशीन पाहून अनेक जण थक्क झाले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसत आहेत. “अशी मशीन खरंच उपलब्ध आहे का”, असा सुद्धा प्रश्न तर एका तरुणीने मैत्रिणीला टॅग करीत “इथे आपण फ्रीमध्ये इंटर्नशिप करू शकतो” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.