Viral Video Of Husband & Wife: प्रत्येक नात्यात एक वेगळेपण असते. असेच एक नातं म्हणजे नवरा-बायकोचं. या नात्यात दोन वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती अनेकवर्ष एकत्र राहतात. अनोळखी व्यक्तीबरोबर संसार करतात. या नात्यात प्रेम, विश्वास, वाद, रुसवे-फुगवे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्यामुळे एकमेकांची साथ मिळाली तर हे दोघं मोठ्यातल्या मोठ्या संकटावर मात करू शकतात. तर आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) एका नवरा-बायकोचा मजेशीर खेळ सुरू आहे, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल आणि त्यांचे कौतुकसुद्धा कराल.

व्हायरल व्हिडीओ गावाकडील आहे. नागरिकांनी एक अनोखा खेळ आयोजित केला आहे. एका मैदानात तीन जोडप्यांसह खेळ सुरू आहे. हा खेळ चमचा-गोटी किंवा आणखीन कोणता नसून नारळाच्या झाडाच्या फांदीपासून खेळण्यात येतो आहे. नारळाच्या झाडाच्या फांदीवर बायकोला बसवून ती फांदी नवऱ्याने ओढत सीमारेषेपर्यंत आणायची. तर अशाप्रकारे हा खेळ सुरू होतो. प्रत्येक नवरा आपल्या बायकोला नारळाच्या झाडाच्या फांदीवर बसवून ओढत सीमारेषेपर्यंत आणतो आणि इथेच एक ट्विस्ट येतो. नक्की ट्विस्ट काय आहे, व्हायरल व्हिडीओतून ( Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
one nation one election in 2034
One Nation One Election: २०२९ ला एकत्र निवडणुका घेणं कठीण, २०३४ साल उजाडणार? काय आहेत कारणं? वाचा सविस्तर!
Panchayat fame Aasif Khan marries Zeba
“कुबूल है”! ‘पंचायत’ फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”

हेही वाचा…‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव

व्हिडीओ नक्की बघा…

नवरा-बायकोचं नातं असं असावं…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, नारळाच्या झाडाच्या फांदीवर बसवून नवरा त्याच्या बायकोला ओढत असतो. पांढऱ्या रेषेपर्यंत पोहोचताच त्या फांदीवर नवऱ्याने बसायचं आणि बायकोने ती फांदी ओढत त्याला पुन्हा सीमारेषेपर्यंत घेऊन जायचे असते. हे करताना मात्र प्रत्येक बायकोची तारांबळ उडते. पण, यातसुद्धा प्रत्येक नवरा आपल्या बायकोला जिंकवण्यात तिला ओढत नेण्यासाठी मदत करताना दिसतो आहे. नवरा-बायको एकमेकांना प्रत्येक गोष्टीत कशी मदत करतात याचे उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.

तर या खेळात तीन जोडप्यांपैकी दुसरं जोडपं हा खेळ जिंकतो. खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांमधील एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर @aparna_akd या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. नेटकरी हा अनोखा आणि मजेशीर खेळ पाहून पोट धरून हसत आहेत. तसेच व्हिडीओतील अनेक मजेशीर गोष्टी सांगत कमेंटसुद्धा करत आहेत. तर अनेक जण बायकोला जिंकवण्यासाठीचे नवऱ्याचे प्रयत्न पाहून त्यांचे कौतुकसुद्धा करत आहेत.

Story img Loader