Video Shows Mera Joota Hai Japani song Sing By Tbilisi Guy : भारतातील संस्कृती, वेशभूषा, पाककला, येथील गाणी, गाण्यांमधील स्टेप्स आणि चित्रपट, मालकी अनेकदा परदेशातले लोकांनाही आवडतात. अनेकदा त्यांनी भारतीय स्टाईलमध्ये केलेल्या काही गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रीलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये परदेशातील एका व्यक्तीने भारतातून परदेशात गेलेल्या एका प्रवाशाला आपले टॅलेंट दाखवून थक्क करून सोडले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘मेरा जुता है जापानी’ हे गाणे तुम्ही आजवर अनेकदा ऐकले असेल. त्यावर अनेकद डान्स परफॉर्मन्स सादर केले जातात किंवा वेशभूषा स्पर्धेतसुद्धा या गाण्यातील वेशभूषा केली जाते. पण, जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी येथील एका स्ट्रीट परफॉर्मरने तर सगळ्यांना धक्काच दिला आहे. वाद्यावर एका स्ट्रीट परफॉर्मरने ‘मेरा जूता है जापानी’ हे गाणे गायले, जे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
स्ट्रीट परफॉर्मरने सगळ्यांनाच केले थक्क (Viral Video)
अनेकदा परदेशांत राहणाऱ्या लोकांना भारतीय भाषा समजण्यास किंवा बोलण्यात अडथळा येतो. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, या स्ट्रीट परफॉर्मरने सगळ्यांनाच थक्क करून सोडले आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘मेरा जूता है जापानी’ हे गाणे गाण्यास सुरुवात केली. हावभाव व्यक्त करीत, डान्स करीत अन् वाद्याच्या तालावर हे भारतीय गाणे त्याने अगदी मनापासून गायले. ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल एवढं तर नक्की.
ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर असलेली भारतीय प्रवासी जगभरातील तिच्या प्रवासातील अनोखी दृश्ये नियमितपणे शेअर करीत असते. ती जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी येथे गेली आणि तिने या गाणे गाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करून @listenshreyaaa या अकाउंटवरून शेअर केला आणि ‘जेव्हा तिबिलिसीमध्ये एक स्ट्रीट परफॉर्मर अंताक्षरीमध्ये तुमच्या चुलतभावांपेक्षा चांगले जुने बॉलीवूड गाणे गातो’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.