Viral Video shows Rapper Shared Parents’ love story: ओडिशाचा रहिवासी समीर एक रॅपर म्हणून ओळखला जातो ; जो फक्त २५ वर्षांचा आहे. अलीकडेच त्याने स्वतःच्या पालकांबद्दल सांगत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचे बाबा हे भारतीय तर आई जपानची असते. पण, ओडिशाच्या पुरी येथे त्याच्या आई-बाबांची पहिली भेट झाली होती. तर त्यांची लव्ह स्टोरी कशी कशी सुरु झाली आहे याबद्दल त्याने व्हिडीओत सांगितलं आहे. तर २५ वर्षाचा समीरने आई-बाबांची लव्ह स्टोरी सांगितली त्याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, “ही माझ्या आई आणि बाबांची गोष्ट आहे,” असे सांगत समीरने व्हिडीओची सुरुवात केली. तो पुढे सांगतो की, त्याची आई एक लेखिका आहे. कॉलेजमध्ये असताना तिने वर्ल्ड टुर करण्याचे ठरवले. तेव्हाच तिने ओडिशाच्या पुरीला भेट दिली. तिला पुरी हे शहर खूप आवडले आणि तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुरीत स्थायिक होण्याचे आणि पुस्तक लेखन सुरू करण्याचे ठरवले. पण, प्रत्येकाला उत्पन्नाचे साधन हवे असते. त्यामुळे आईने तेव्हा जपानी पर्यटकांसाठी हॉटेल बांधायचे ठरवले.
व्हिडीओ नक्की बघा…
हॉटेलमुळे सुरू झाली लव्ह स्टोरी :
समीर पुढे सांगतो की, त्यावेळी बरेच जपानी नागरिक पुरीला भेट देत असत. पण, त्याची आई परदेशी असल्याने हॉटेल बांधण्यासाठी जमीन खरेदी करू शकली नाही. पण, नंतर ती योगायोगाने आई तरुणांच्या वडिलांना भेटली आणि त्यांनी लग्न केले. त्यांनी नंतर हॉटेल बांधले आणि बिझनेस पार्टनर बनले. या हॉटेलच नाव ‘लव्ह अँड लाइफ’ आहे ; जे आजही पुरीत आहे. ही लव्ह स्टोरी ऐकून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल व तुम्ही या लव्ह स्टोरीची प्रशंसा कराल एवढं नक्की.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rapperbigdeal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही लव्ह स्टोरी ऐकून अनेक युजर्स कॅमेंटमध्ये प्रशंसा करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंट केली आहे की, “आग्रा येथे ताजमहाल आहे आणि पुरीमध्ये ‘लव्ह अँड लाइफ’”, तर दुसरा युजर म्हणतोय की, “खूप छान लव्ह स्टोरी आहे”, तर तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, “तुमचे पालक कसे भेटले ते शेअर केल्याबद्दल धन्यवाद.” तर चौथ्या युजरने ‘रॅपरच्या आईने लिहिलेल्या पुस्तकाच्या नावाबाबदलही विचारपूस केली’ आदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.