सोशल मीडियावर अपघाताचे थरारक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात दरम्यान सध्या दोन पुलाच्या मधोमध अडकलेल्या बसचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओ कर्नाटकातील आहे. बेंगळुरू-तुमाकुरू महामार्गावरील उड्डाणपुलावरून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पुलावर कोसळता कोसळता थोडक्यात बचावली. सुमारे ४० फूट उंचीवरून ही बस अडकल्याचा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

१८ मे रोजी सकाळी नेलमंगलाजवळील मदननायकनहल्ली पुलाजवळ हा अपघात झाला. सोमवारपेठहून बेंगळुरूला सुमारे ४० प्रवासी घेऊन बस जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने कारला धडक देणे टाळण्याचा प्रयत्न केल्याने बस पुलाच्या मधोमध जाऊन अ़डकली. शेजारी उड्डाणपुलाच्या कठड्यावर बस आदळल्याने बस खाली पडली नाही. बसचा चालक आणि कंडक्टरसह आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने सर्वांना बसमधून सुखरूप उतरण्यास मदत केली, मात्र अपघातामुळे सुमारे तासभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
lucknow passenger and conductor fight in roadways bus video viral
बसमध्ये तिकिटावरून राडा! कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ येथे पहा:

हेही वाचा – “शिंगाने जोरात दिली धडक अन्…..”, बैलाला खाऊ घालणे महिलेला पडले महागात! हल्ल्याचा थरारक Video Viral

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “त्यांनी संपूर्ण भारतातील सार्वजनिक वाहतूक बसेसवर वेग मर्यादा सेट केली पाहिजे.” आणि दुसरा वापरकर्ता म्हणाला, “आश्चर्य नाही. बंगलोरमध्ये प्रत्येकजण अशा प्रकारे गाडी चालवतो.” तिसरा म्हणाला, “बहुतांश केएसआरटीसी आणि बीएमटीसी चालक कर्तव्यात निष्काळजीपणा करत आहेत.” चौथा म्हणाला,”अरे देवा, Ksrtc बस चालक कधीच कोणाचा विचार करणार नाहीत…” पाचवा म्हणाला, सर तुम्हाला येथे पार्किंग करण्यास परवानगी नाही.” आणखी एकाने लिहिले की,”Ksrtc – bmtc बस ड्रायव्हर्स ब्रेक वापरत नाहीत. ही पहिलीच वेळ नाही. आशा आहे की त्यांनी ब्रेकचा वापर करावा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही क्रॉस रोड करण्याचा प्रयत्न करता तेव्हा बस ड्रायव्हर्स या परिस्थितीत समान वेग राखून तुम्हाला मिनी हार्ट अटॅक देतात.”

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! चिकन तळण्याच्या जाळीने काढला जातोय गटारातील कचरा, धक्कादायक Video Viral