Viral Video Shows Parents Love For Their Children’s : आई-वडिलांबरोबर राहण्यात खरा स्वर्ग आहे. पैसा, पद आई-वडिलांहून मोठे नाही. मात्र, आज लाखभर पैसे कमावणारेही वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. असं असले तरीही काही मोजके लोक आई-बाबांचे महत्व समजतात. एक दिवसाची पिकनिक असो किंवा तीन ते चार दिवसांसाठी कामानिमित्त बाहेर जायचं असो. आई व बाबा आपली बॅग भरण्यात नेहमी मदत करतात. आपण घराच्या बाहेर पडेपर्यंत त्यांचं छोट्या छोट्या वस्तू बॅगमध्ये ठेवणे बाकीच असते. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये आई-बाबा लेकाची बॅग भरताना दिसत आहे.

आई आणि बाबा त्यांच्या लेकाची बॅग भरत असतात. व्हायरल व्हिडीओच्या सुरवातीला बेडवर बिस्किटांचे भरपूर पुढे आणि खायचे वेगवेगळे पदार्थ तर घरी बनवलेल्या पदार्थ बरण्यांमध्ये भरलेले असतात. तर हे पाहून आई-बाबांचा लेक व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतो. प्रत्येक पिशवीत वेगवेगळे पदार्थ आई पिशवीत भरते आणि बाबा ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवण्यात मदत करत असतात. आई-बाबा त्यांचे मुलांवर असणारे प्रेम कसे व्यक्त करतात व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
devendra fadnavis name confirmed for maharashtra chief Minister
फडणवीसच; पण गृह कोणाकडे? एकनाथ शिंदे मुंबईत परतल्याने खातेवाटपाची चर्चा आजपासून
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
President Joe Biden's pardon for Hunter Biden
Joe Biden : नाही, नाही म्हणत जो बायडेन यांनी ‘तो’ निर्णय घेतलाच; शस्त्र आणि कर फसवणूक प्रकरणात शेवटच्या क्षणी…
PM Narendra Modi on Hindu Temple Attack in Canada
PM Modi on Temple Attack: कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून कडक शब्दात निषेध, म्हणाले…

हेही वाचा…​लक्षात राहणारी मैत्री… ! २३ वर्षानंतर रिक्रिएट केला क्षण, VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे ते दिवस

व्हिडीओ नक्की बघा…

पालकांचं प्रेम

शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक जण घरापासून दूर राहतात. गणपती, दिवाळी, होळी, नाताळच्या सुट्टी दरम्यान ही लेकरं आपल्या घरी काही दिवसांसाठी येतात. मग अशावेळी सुट्टी संपली आणि पुन्हा ही लेकरं त्यांच्या हॉस्टेलवर जायला निघाली की, आई-बाबा अशाप्रकारे त्यांच्या आवडीनिवडीच्या वस्तू बॅगमध्ये भरण्यास सुरुवात करतात. ब्रशपासून ते अगदी खाण्यापिण्याच्या सामानापर्यंत सगळ्या वस्तू नीट ठेवल्या आहेत ना हे सुद्धा पाहतात आणि कोणत्या गोष्ट कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sushil._425 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘घरातून निघताना मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू बॅगमध्ये भरणे ही फक्त एक भावना नसून प्रत्येक पालकांच प्रेम आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत. तर काही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या घरच्यांची आठवण आली आहे असे ते व्हिडीओच्या कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.