viral video shows Children danced to Pushpa 2 song Angaaron : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा २’ या दाक्षिणात्य सिनेमाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’ प्रमाणेच ‘पुष्पा २’ची हिट ठरेल अशी उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे. पण, काही महिन्यांपूर्वी ‘पुष्पा २’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच ‘अंगारो सा’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. गाणं प्रदर्शित होताच अगदी सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच या गाण्यावर रील बनवू लागले. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral ) होत आहे; यामध्ये दोन चिमुकल्यांनी या गाण्यावर हुबेहूब डान्स सादर केला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) महाराष्ट्रातील परभणीचा आहे. येथे एक नृत्य कार्यक्रम सुरु आहे. अनेक नागरिकांची स्पर्धा पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. स्पर्धेसाठी भलामोठा डीजे लावण्यात आला आहे. पण, या दोन चिमुकल्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदान्ना यांनी ‘अंगारों सा’ या गाण्यातजसे हुबेहूब कपडे परिधान केले अगदी तसेच या दोघांनी घातले आहेत आणि डान्स करताना दिसत आहेत. चिमुकल्यांचा हा डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘हलके-हलके जोजवा…’ चिमुकलीने बांधलेल्या पाळण्यात निजलेलं श्वान बाळ पाहा
व्हिडीओ नक्की बघा…
खरे अल्लू-अर्जुन फॅन्स…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारो सा’ गाणं वाजू लागतं. त्यानंतर दोन्ही चिमुकले गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतात. गाण्यातील हुबेहूब स्टेप्स, हावभाव, त्यांची अदा, प्रत्येक डान्स स्टेप्सवर त्यांचा ठेका अगदी पाहण्यासारखे आहेत. खासकरून चिमुकलीच्या डान्सचं खूपच कौतुक होत आहे. या डान्सने उपस्थितांची मने जिंकली आहेत व ते टाळ्यांसह चिमुकल्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @star_dance_studio_04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पुष्पा’ अशी या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच नेटकरी देखील हा व्हिडीओ पाहून दोन्ही चिमुकल्यांनी प्रशंसा करताना दिसून आले आहेत. एक युजर म्हणतोय ‘खूपच छान ॲक्टिंग करतेस’, तर दुसरा म्हणतोय की, ‘खरे अल्लू-अर्जुन फॅन्स’, तर अनेक जण चिमुकलीच्या हावभावपाहून तिचं कौतुक करत आहेत’, तर काही जा व्हिडीओ अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला टॅग करताना दिसत आहेत.