Viral Video : लग्न हा मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात खास क्षण असतो. एकीकडे तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार असते; तर दुसरीकडे लहानपणापासून ज्या घरात राहिलो, ते घर कायमचे सोडावे लागणार असते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी ती मंडपात येताना नाचून, तर कधी डोळ्यांतून पाणी आणून तिच्या भावना व्यक्त करत असते. पण, आज सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे. त्यामध्ये नवरी डोली, बैलगाडी किंवा वाजत-गाजत नाही, तर एक खास एंट्री करत सगळ्यांसमोर आली आहे, जे पाहून तुमचे डोळे पाणावतील एवढं तर नक्कीच…

नवविवाहित जोडपे सुरभी आणि ऋषभ यांच्या लग्नादरम्यानचा हा क्षण आहे. व्हायरल व्हिडीओत लग्नासाठी अनेक मंडळी उपस्थित आहेत. सर्वत्र काळोख करण्यात आला आहे आणि प्रत्येक जण नवरीच्या एंट्रीची वाट पाहत आहे. यादरम्यान स्टेजच्या पडद्यावर एक लाईट दिसू लागते. प्रोजेक्टरवर एखादा चित्रपट किंवा प्रेझेंटेशन दाखवले जाते अगदी त्याचप्रमाणे नवरीचा प्रवास पडद्यावर दाखविण्यात आला आहे. नक्की कशा प्रकारे नवरीची एंट्री झाली ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा…‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, पडद्यावर मेस्मेरेसिंग लाइट प्रोजेक्शन (mesmerising light projections) चित्रित करण्यात आले आहे. पडद्यावर एका लहान मुलीचा प्रवास आणि तिच्या वडिलांबरोबरचे मनमोहक क्षण दाखवले जात आहेत. जसजसा वेळ निघून जातो, तसतसे तिचे रूपांतर एका तरुण स्त्रीमध्ये होते; जी तिच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला भेटते. तरुण मुलगा त्या मुलीला प्रपोज करतो आणि तरुणी हो म्हणते. सुरभी आणि ऋषभ अशी या दोघांची नावे दिसतात. त्यानंतर अखेर पडदा उघडतो आणि नवरीची एंट्री होते.

आतापर्यंतची सगळ्यात सुंदर एंट्री

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @simplysurreal_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नवरीची एंट्री होत असताना ‘मैं नचदी फिरा’ हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजताना दिसते आहे. नवरीचा मंडपात प्रवेश करतानाचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला, ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सचे डोळे पाणावले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “आतापर्यंतची सगळ्यात सुंदर एंट्री. हा व्हिडीओ पाहून मी का रडते आहे.” दुसरा म्हणतोय, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader