Bhandara Viral Video: भंडाऱ्यात जेवणासाठी जमा होणारी भाविकांची गर्दी हाताळणे हे फार कठीण काम असते. इथे आलेला एकही व्यक्ती जेवल्याशिवाय जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे जेवण वाढणाऱ्यांनाही फार चपळपणे काम करावे लागते. लोकांना हवे नको तो पटपट आणून द्यावे लागते. पण, हे काम जर फार संथपणे सुरू असेल तर इतर लोक न जेवताच वैतागून निघून जातात. त्यामुळे जेवण वाढणाऱ्या लोकांच्या कामात वेग असणे गरजेचे असते. सोशल मीडियावर नुकताच एका भंडारा कार्यक्रमाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात चार तरुण लोकांना ज्या वेगाने प्लेट, डिश, ग्लास आणि नंतर जेवण वाढत आहेत, तो वेग पाहून बसलेले भाविकही अचंबित झाले. अनेकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या तरुणांनी भंडारोलॉजीमध्ये पीएचडी घेतली की काय, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे.
भंडाऱ्यात जेवण वाढण्याचा तरुणांचा वेग आणि कसब पाहून नेटिझन्स अवाक्
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता, चार तरुण भंडाऱ्यात जेवण्यासाठी जमिनीवर बसलेल्या भाविकांना वाऱ्याच्या वेगाने प्लेट, डिश, ग्लास वाटत आहेत. इतकंच नाही तर जेवणही त्याच वेगाने वाढले जात आहे. त्या चौघांनीही मॅचिंग लाल शर्ट आणि काळी पँट घातली आहे, ते चौघेही एकामागोमाग एक अशा पद्धतीने लोकांना प्लेट, ग्लास ते जेवण अवघ्या सेकंदात देऊन मोकळे होत आहेत. चौघेही इतक्या जलद गतीने जेवणाऱ्यांची सेवा करताना दिसतायत की, जेवणाऱ्या व्यक्तीला काही मागण्याची गरज लागत नाहीये. भंडाऱ्यात जेवण वाढण्याचा तरुणांचा हा वेग आणि कसब पाहून नेटिझन्सदेखील प्रभावित झाले आहेत.
@terakyalenadena या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मास्टर ऑफ भंडारा आणि बॅचलर ऑफ सर्व्हिंग. या मजेशीर व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, मी त्यांचा जेवण वाढण्याचा वेग आणि आणि अचूकता पाहून प्रभावित झालो आहे, दुसऱ्या युजरने लिहिले की, हे तरुण सुपरफास्ट निघाले. आणखी एका युजरने लिहिले की, मला वाटते की त्याने भंडारोलॉजीमध्ये पीएचडी केली आहे. शेवटी एकाने लिहिले की, तुम्ही हा क्रॅश कोर्स कुठून केला भावांनो? मी वेग पाहून प्रभावित झालो.