Video Shows Little Boy Playing Cricket In Funny Style : क्रिकेट म्हणजे अनेकांचे पहिले प्रेम असते. काहींना क्रिकेटमधील बारीक-सारीक गोष्ट कळते, तर काहींना फक्त मॅच बघण्यात मजा वाटते. त्यामुळे अनेकदा आवड आणि मजा-मस्ती म्हणून बिल्डिंगमध्ये, समुद्रकिनारी तर कधी मैदानात, तर केव्हा चाळीत दोन टीममध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. हे सामने बघायला आणि खेळायला खूपच मजा येते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये अगदी मजेशीर पद्धतीने मॅच खेळली जाते आहे.
व्हायरल व्हिडीओत बिल्डिंगच्या खाली मॅच सुरू असते. ही मॅच तरुण मंडळी किंवा मोठ्या माणसांची नाही, तर चिमुकल्यांची असते. या चिमुकल्यांचा उत्साह वाढवायला प्रचंड मंडळी दिसत आहेत. एवढेच नाही, तर त्यांना बॉल कसा टाकायचा, बॉल जवळ आला की, बॅट कशी मारायची, अगदी धावा कशा घ्यायचे हेसुद्धा इतर मंडळी त्यांना मॅचदरम्यान सांगताना दिसत आहेत. तर घडते असे की, चिमुकल्यांची मॅच सुरू होते. त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या चिमुकल्याजवळ बॉल येतो. तो बॅटने बॉल मारतो.
चिमुकला अगदी स्टाईलमध्ये बॉल मारतो. बॉल दूर गेल्यामुळे तेव्हा त्याला धाव घेण्यासाठी जाणे अपेक्षित असते. त्यामुळे सगळे जण त्याला ओरडून रन घे, असे म्हणतात. पण, चिमुकला एवढी माणसे बघून गोंधळलेला असतो. मग तिकडे उपस्थित असलेली दोन माणसे चिमुकल्याचा हात पकडतात आणि त्याच्याबरोबर रन घेण्यास धावतात. ते पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. तिथे उपस्थित एका अनोळखी माणसाने या मजेशीर मॅचचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले आहे.
वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड तोडणार (Viral Video)
व्हिडीओ नक्की बघा…
आयपीएल २०२५ च्या कालच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी केलेली कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. तर हा व्हिडीओ पाहून नेटकरी आता व्हिडीओतील चिमुकला वैभव सूर्यवंशचा रेकॉर्ड तोडणार, असे मस्करीत म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @raya_31122022 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत मॅचमध्ये भांडण, एकमेकांना हरवण्याची जिद्द तुम्ही पाहिली असेल. पण, एक टीम दुसऱ्या टीमला मदत करणारी ही मॅच आज तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल एवढे तर नक्की. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि आजवर आम्ही अशी मॅच पाहिली नाही असेसुद्धा आवर्जून कमेंट्समध्ये सांगताना दिसून आले आहेत.