Viral Video Of Little Boy : भजन ही कला खूप वर्षांपासून चालत आली आहे. एखादी पूजा असो किंवा मंदिरात एखादा खास कार्यक्रम; भजन आवर्जून ठेवण्यात येते. ढोलकी, टाळ व पेटी यांच्या साथीनं सादर होणारी भजनं, अभंग ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे पारंपरिक लोकगीतं, भजनं आणि अभंग हे आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहेत. जुन्या गोष्टी युवा पिढीला आवडू लागल्या आहेत. आज याचं उत्तम उदाहरण दाखविणारा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) एक कुटुंब दिसतं आहे. जमिनीवर काही जण भजन करण्यासाठी बसले आहेत. पण, या सगळ्यात एका चिमुकल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण- घरातील पुरुष मंडळी कोणी ढोलकी, टाळ घेऊन भजन गात असतात; तर घरातील महिला भजन ऐकत असतात. या सगळ्यांमध्ये कानटोपी घातलेला एक चिमुकला मांडी घालून बसलेला असतो आणि भजनाच्या तालावर मान डोलावत असतो. भजनात दंग झालेला हा चिमुकला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘मी तुला घ्यायला येईन…’ कारणं सांगणाऱ्या कर्मचाऱ्याला मॅनेजरने दिली भन्नाट उत्तरं; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा…

बालपणात लहान मुलांवर झालेले चांगले संस्कार त्यांचं आयुष्य घडवतात, असं म्हणतात. त्यासाठी घर, परिवार, समाज आणि सभोवतालचं वातावरण नेहमी चांगलं असलं पाहिजे. कारण- या सगळ्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे मुलांना वाईट गोष्टी न शिकवता, चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, असं आपल्याला मोठी माणसं नेहमी सांगतात. आज व्हायरल व्हिडीओत (Viral Video) याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. घरात सगळ्यांना भजन करताना पाहून चिमुकल्याच्या आई-बाबांनी त्याला सर्वांबरोबर बसवलं आणि काही वेळातच चिमुकला भजनात दंग होऊन, भजनाचा आनंद लुटतानाही दिसला.

हा क्षण कधी निघून जाऊ नये

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @little_rana_baby या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘घरातलं वातावरण जसं, तशीच मुलं घडतात’, असा मजकूर या व्हिडीओबाबत लिहिण्यात आला आहे. एका युजरनं कमेंट केली आहे, “बालपणातील संस्कार आयुष्य घडवते.” दुसऱ्यानं, “मला वर्षातून दोन वेळा अनुभवायला मिळतं. गेली ९५ वर्षं घरी मोठ्या उत्सवात राम जन्म आणि गोकुळाष्टमीला खास भजन ठेवलं जातं. मी या भजनात एवढा दंग होतो की, हा क्षण कधी निघून जाऊ नये, असं वाटतं. जय श्री राम,” असं सांगितलं. तसेच बाकीच्या युजर्सनी या व्हिडीओचं विविध शब्दांत कौतुक केलं आहे.