Viral Video : एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली तरी लहानपणी केलेल्या खोड्या कधीही विसरत नाही. तसेच काही लोकांना लहानपणीच्या गोष्टी करायला अजूनही आवडते. त्यातली एक गोष्ट म्हणजे बबल रॅप फोडणे. एखादे पार्सल घरी आले किंवा मार्केटमधून एखादी नवीन वस्तू घरी आणली की, बॉक्स उघडल्यावर ती सगळ्यात आधी बबल रॅपच्या शीटमध्ये गुंडाळलेली दिसते. मग आपल्यातील अनेक जण बबल रॅप बाजूला काढून, त्यातील बबल्स बोटाने फोडण्यास सुरुवात करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओच्या (Viral Video) सुरुवातीला कुटुंबातील सदस्य बसलेले असतात. बाबा मार्केटमधून एक नवीन घड्याळ घेऊन आलेले असतात. हे घड्याळ एका बबल रॅपच्या शीटमध्ये गुंडाळलेले असते. बाबा घड्याळ काढताच त्याला गुंडाळलेलं बबल रॅप पाहून बाबांची लेक खूश होते; पण ती तिच्यासाठी नवीन आणलेलं घड्याळ न पाहता, त्यावर असणार बबल रॅप काढून घेते आणि खुर्चीजवळ जाऊन उभी राहते. बबल रॅप पाहिल्यानंतर चिमुकली कशा प्रकारे खूश झाली हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकलीचे बाबा बॉक्समधून घड्याळ काढतात. तेव्हा कुटुंबातील सदस्यांना वाटते की, चिमुकली लहानसं घड्याळ पाहून खूश झाली आहे. पण, चिमुकली घड्याळाऐवजी बबल रॅप घेऊन पळत एका खुर्चीकडे जाते आणि ते फोडण्यास सुरुवात करते. हे पाहून घरातील सर्वच सदस्य थक्क होऊन जातात आणि जोरजोरात हसण्यास सुरुवात करतात. तर हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं बालपण आठवलं असेल एवढं तर नक्की…

आता हा व्हिडीओ स्वतःला कसा टॅग करू?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ tamil.engineer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बबल रॅप म्हणजे प्रेम’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांच्या लहानपणीचे अनुभव कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. ‘आम्ही अक्षरशः बबल रॅप फोडण्यावरून भांडायचो’, ‘आता हा व्हिडीओ स्वतःला कसा टॅग करू’, ‘मीसुद्धा लहानपणी बबल रॅप जमा करून ठेवायचो’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows little girl happiness to burst the bubble wrap will win your heart must watcha asp