Viral Video : लहान बाळाला झोपवण्यासाठी सहसा पाळण्याचा उपयोग केला जातो. आता तर अगदी मोबाईलवर ऑपरेट होणारे डिजिटल पाळणे सुद्धा आले आहेत. पण, पूर्वी पाळणे नसेल की मात्र साडीचा पाळणा बांधला जायचा. भिंतीच्या दोन टोकांना किंवा दोन खिळ्यांच्या साहाय्याने ही साडी अगदी पाळण्यासारखी बांधली जायची. त्यानंतर यात बाळाला झोपवलं जायचं, असे तुम्ही अनेकदा नक्कीच पाहिलं असेल. तर आज व्हायरल व्हिडीओत श्वानाच्या पिल्लासाठी एक खास झोपाळा बनवण्यात आला आहे.

झोपाळ्यावर बसून झोका घ्यायला कोणाला नाही आवडत. आजूबाजूला गार्डन नसेल तर अगदी झाडांच्या फांद्यांचा किंवा टायरचा सुद्धा झोपळा बनवून त्याचा आनंद लुटला जातो. तर आज व्हायरल व्हिडीओत तसंच काहीस पाहायला मिळालं आहे. घराबाहेर चिमुकली श्वानाबरोबर खेळत असते. तितक्यात तिला एक कप्लना सुचते. ती घराबाहेर दिसणारं एक जुनं टायर घेते. त्याला एक लांब दोरी लावून छताला बांधून ठेवते. नक्की पुढे चिमुकलीने काय केलं व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : लाखोंच्या खर्चातून रिक्षाची सजावट, जस्टिन बीबरसह अनेक कलाकारांच्या पोस्टर्सचे दर्शन; पाहा रिक्षाची खास झलक

व्हिडीओ नक्की बघा…

साडीचा नव्हे टायरचा पाळणा :

व्हायरल व्हिडीओत (viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकलीने साडीचा नव्हे टायरचा पाळणा बनवला आहे. मोठ्या दोरीच्या सहाय्याने तिने हा तयार टायर लटकवून ठेवला आहे. त्यानंतर तिच्या डोक्यात एक युक्ती येते व ती छोट्याश्या श्वानाच्या पिल्लाला टायरमध्ये बसवते आणि आपल्या हाताने या टायरला झोका देत श्वानाच्या पिल्लाला खेळवते. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की, श्वानाचे पिल्लू देखील या टायरच्या पाळण्यावर अगदी शांत झोपून, आनंद लुटताना दिसत आहे; जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @labra.dor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘व्हिडीओ तुमचं मन जिंकेल’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक नेटकरी सुद्धा या व्हिडीओवर त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘काही गोष्टी आपण फक्त लहानपणीच करू शकतो’ तर एका दुसऱ्या युजरला त्याच्या ‘श्वानाची आठवण आली आहे’, तर तिसऱ्याने ‘प्रेम’ अशी कमेंट केली आहे. तर चौथा म्हणतोय की, ‘जगातला प्रत्येक आनंद प्राण्यांना मिळाला पाहिजे’ ; आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.